Producer Vishesh Bhatt’s special reaction to the music of ‘Awarapan 2’ : यंदाच्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला ‘आवारापन 2’ हा चित्रपट तब्बल १९ वर्षांनंतर प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे. सिक्वेलची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, २०२६ मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी तो एक ठरला आहे. चाहत्यांचा उत्साह आणखी वाढवण्यासाठी निर्माता विशेष भट्ट आणि चित्रपटातील कलाकारांनी नुकतेच एका खास इन्स्टाग्राम लाइव्ह सत्राद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बहुप्रतीक्षित ‘आवारापन 2’चा ट्रेलर ६ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली.
मुंबईच्या पोरीनं ChatGPT ला सांगितली लव्ह स्टोरी… अन् हातावर उमटली स्वप्नातली लग्नाची मेहेंदी…
चित्रपटाच्या संगीताविषयी बोलताना निर्माता विशेष भट्ट म्हणाले, “‘आवारापन’च्या पहिल्या भागाच्या यशात संगीताचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता. प्रीतम, मुस्तफा, सय्यद कादरी आणि संपूर्ण टीमशिवाय ‘आवारापन’ची कल्पनाच करता येत नाही. त्याचप्रमाणे ‘आवारापन 2’ही या कलाकारांशिवाय पूर्ण होऊ शकला नसता. मिथून, अमाल मलिक, सय्यद कादरी, रश्मी आणि संपूर्ण संगीत टीमने या चित्रपटासाठी मनापासून मेहनत घेतली असून त्यांनी आपल्या कामात जीव ओतला आहे.”
‘आवारापन 2’ मध्ये इमरान हाश्मी पुन्हा एकदा शिवम पंडितच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत दिशा पटानी, शबाना आझमी, सुविंदर विक्की, विजयंत कोहली, अनिरुद्ध रावल आणि अतुल कुमार यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटातील संगीत मिथून, जीत गांगुली, अमाल मलिक, अखिल सचदेवा आणि वासिफ यांनी दिले आहे.
पंतप्रधान मोदींच्या व्हिडीओच्या वादा दरम्यान मार्क झुकरबर्गने माफी मागितली पण… प्रकरण वेगळच
मुकेश भट्ट आणि विशेष फिल्म्स प्रस्तुत, विशेष भट्ट निर्मित, नितीन कक्कर दिग्दर्शित आणि बिलाल सिद्दीकी लिखित ‘आवारापन 2’ हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
