Download App

प्रा. वामन केंद्रेंची ‘मॅजिक ॲाफ ॲक्टींग २’ कार्यशाळा नि:शुल्क, कुठं होणार कार्यशाळा?

  • Written By: Last Updated:

Magic of Acting 2 : नाटक दिग्दर्शक-प्रशिक्षक, एनएसडीचे माजी संचालक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते पद्मश्री प्रा. वामन केंद्रे (Prof. Vaman Kendre) यांनी ‘मॅजिक ऑफ अॅक्टिंग 2’ (Magic of Acting 2) या दुसऱ्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. 6 ते 8 जानेवारी 2024 या कालावधीत दादरच्या राजर्षी शाहू सभागृहात ‘अभिनयाची जादू’ या विषयावरील ही मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

Year Ender 2023: इम्पॅक्ट प्लेअर ते टाइम आउट, ‘या’ नवीन नियमांनी क्रिकेट बदलले

रंगपीठ थिएटर आणि श्री छत्रपती शिवाजी स्मारक ट्रस्ट, मुंबईच्या वतीने आयोजित ही कार्यशाळा सायंकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. सदर कार्यशाळा ही १६ ते ५५ वर्ष वयोगटातील कलावंतासाठी आहे. या कार्यशाळेत अभिनयाची जादू काय असते, या क्षेत्रात भविष्य घडवण्यासाठी काय करावे लागते, या संबंधी प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. नाटक, चित्रपट, दूरदर्शन, जाहिरात, वेब सिरिज, नाट्य व अभिनय प्रशिक्षण, अभिनय संशोधन आदी माध्यमांमध्ये करिअर करण्यासाठी काय करावे याचे तपशीलवार दिग्दर्शन केले जाईल.

मुद्रांक शुल्क दंडातील सवलतीसाठी अभय योजना लागू, कधीपर्यंत घेता येणार लाभ? 

ही कार्यशाळा निःशुल्क असून या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी व अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या कलावंतानी सदर कार्यशाळेत प्रवेश घेण्यासाठी 7039475537 अथवा 9820868628 या नंबरवर संपर्क साधून आपले नाव नोंदवावे. अथवा rangpeeththeatremumbai@gmail.com येथे संपर्क साधावा, असे आवाहन रंगपीठ थिएटर मुंबईच्या सौ. गौरी केंद्रे यांनी व श्री. छत्रपती शिवाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी केले आहे.

प्रा. वामन केंद्रे यांचं अभिनय व नाट्य प्रशिक्षण क्षेत्रातील योगदान हे अमूल्य व बेजोड आहे. त्यांच्याकडे शिकलेले आणि नावारूपाला आलेले शेकडो कलावंत आज नाटक, चित्रपट, मालिका, जाहिरात, वेबसिरीज, रेडिओ, नाट्य-चित्रपट शिक्षण इत्यादी माध्यमात अग्रेसर आहेत. आत्तापर्यंत केंद्रे यांनी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, चीन, जापान, सिंगापूर , मॉरीशस इत्यादी देशांबरोबरच भारतभर ४००च्यावर कार्यशाळा घेऊन राष्ट्रीय आंतर्राष्ट्रीय दर्जाचे कलाकार घडवले आहेत.

प्रा. वामन केंद्रे यांना आत्तापर्यंत सात राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ज्यामध्ये संगीत नाटक अकादमी दिल्ली पुरस्कार , राष्ट्रीय कालीदास सन्मान (मध्य प्रदेश) ब. व. कारंत पुरस्कार, मनोहर सिंग स्मृती पुरस्कार (एन.एस.डी), राष्ट्रीय अभिनव रंग सन्मान (उज्जैन) रमेश सिंग राष्ट्रीय सन्मान (पटना) व पद्मश्री पुरस्कार (भारत सरकार) अंतर्भूत आहेत.

 

follow us

संबंधित बातम्या