Download App

Pune International Film Festival :आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नगरचा ‘मदार’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

  • Written By: Last Updated:

पुणे : एकविसाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Pune International Film Festival) यंदा अहमदनगरच्या ‘मदार ’ (Madar) या मराठी चित्रपटाने आपली छाप सोडली आहे. या चित्रपटाने विविध पुरस्कार मिळवित महोत्सव गाजवला आहे. या चित्रपटाला राज्य सरकारचा संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराने अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

पुणे फिल्म फाऊंडेशन आणि राज्य सरकारच्या वतीने आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोपाला सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेत्री विद्या बालन, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जानू बरवा, चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते.

यावेळी अहमदनगरच्या मदार या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री आणि सिनेमाटोग्राफरचा पुरस्कारही मिळाला आहे. यंदाचा प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार बेल्जियम आणि फ्रान्स येथील ‘तोरी अँड लोकिता’ या चित्रपटाला प्रदान करण्यात आला.

5 पुरस्कारांवर मदारची छाप
यामध्ये महाराष्ट्र शासनाचा संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट अभिनेता तसंच, सर्वोत्कृष्ट छायांकन या विभागांचा समावेश आहे.

पुरस्काराचे मानकरी : हे पुरस्कार मंगेश बदर, अमृता अगरवाल, मिलिंद शिंदे, आकाश बनकर व अजय भालेराव यांनी जिंकले आहेत.

मदारची कलाकार मंडळी…
मदारया चित्रपटाचे निर्माते अभिनेते मिलिंद शिंदे, मंगेश बदर, मच्छिंद्र धुमाळ आहे. तर कलाकार मिलिंद शिंदे, अमृता आगरवाल, आदिनाथ जाधव, अजिनाथ केवढे, भागाबाई दुधे, अनुजा कांबळे व इतर कलाकार आहेत

आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार खालील प्रमाणे :
– प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – बेल्जियम आणि फ्रान्स येथील – तोरी अँड लोकिता
– प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक – मरिना गोर्बाक – क्लोंडिके
– एमआयटी- एसएफटी ह्युमन स्पिरीट – क्लोंडिके
– स्पेशल ज्युरी मेंशन – बॉय फ्रॉम हेवन
– स्पेशल ज्युरी मेंशन अभिनेत्री – लुबना अझबल- ब्ल्यू काफ्तान.

Tags

follow us