Download App

Ranjit Sidhu: सुप्रसिद्ध गायकाने संपवलं स्वतःचं आयुष्य; रेल्वे ट्रॅकजवळ सापडला मृतदेह

Ranjit Sidhu Sucide case: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांच्या हत्येच्या धक्क्यातून चाहते अजूनही सावरले नाहीत, त्यातच आता पंजाबी (Punjabi Singer) मनोरंजन क्षेत्रातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. पंजाबी लोक गायक रणजीत सिद्धू (Ranjit Sidhu Sucide case) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. शुक्रवारी रात्री सिंगरचा मृतदेह रेल्वे ट्रॅकजवळून सापडला असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रणजीत सिद्धूने नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून ट्रेनसमोर येऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रणजीत सिद्धू यांच्या मृत्यूप्रकरणामध्ये जीआरपी एसआयची माहिती समोर आली आहे.  जीआरपी आणि एसआय जगविंदर सिंह आणि नरदेव सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना शुक्रवारी रेल्वे ट्रॅकजवळ एक मृतदेह सापडला.

पोलिसांनी त्या मृतदेहाचा तपास केला असता, तेव्हा हा मृतदेह दुसऱ्या कोणाचा नसून नछतर सिंह यांचा मुलदा रणजित सिंह यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मृतदेह सापडल्यावर त्वरित त्यांच्या कुटुंबियांना सांगण्यात आले होते. गायकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. रणजीत सिंगच्या बायकोने दिलेल्या माहितीनुसार, सिंगरचे तिच्या नातेवाईकांशी फार भांडण होत होते.

Ravi kishan: सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्याची लेक होणार भारतीय सैन्यात भरती; जाणून घ्या तिच्याबद्दल

गेल्या काही दिवसापूर्वी रणजीतने आपल्या मुलीशी लग्न केले होते, त्यानंतर त्याचा नातेवाईकांशी मोठा वाद घालण्यास सुरु केला होता. त्याचा छळ होत असल्याने रणजीतने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. नरदेव सिंह म्हणाले की, याप्रकरणी काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Tags

follow us