ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना यंदाचा पुण्यभूषण जाहीर

ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे (Mohan Agashe)  यांना यंदाचा पुण्यभूषण (Punya Bhushan Award) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रघुनाथ मालशेलकर यांच्या अध्यक्षेतेखाली निवड समितीने आगाशे यांच्या नावाची निवड केली आहे. मराठी-हिंदी चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल मोहन आगाशे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. Nilesh Rane : […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (25)

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (25)

ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे (Mohan Agashe)  यांना यंदाचा पुण्यभूषण (Punya Bhushan Award) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रघुनाथ मालशेलकर यांच्या अध्यक्षेतेखाली निवड समितीने आगाशे यांच्या नावाची निवड केली आहे. मराठी-हिंदी चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल मोहन आगाशे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Nilesh Rane : उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांना ब्लॅकमेल करायचे…

येत्या जुलै महिन्यात हा पुरस्कार दिला जाणार असून, रोख एक लाख, सोन्याच्या फळाने पुण्याच्या भूमीची नांगरणी करणाऱ्या बालशिवाजींची प्रतिकृती आणि ग्रामदैवत असणाऱ्या कसबा गणपतीचे छायाचित्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमात सीमेवर कर्तव्य बजावताना जखमी झालेल्या जवानांनादेखील गौरवण्यात येणार आहे. यामध्ये सेलर राधाकृष्णन, हवालदार पंजाब एन वाघमारे, सेलर सुदाम बिसोई, गनर उमेंद्र एन आणि लास्न नाईक निर्मलकुमार छेत्री आदी जवानांचा समावेश आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, व्यंकय्या नायडू, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह महाराष्ट्राचे सर्वच माजी मुख्यमंत्री, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटपटू कपिल देव, सचिन तेंडूलकर आदीं मान्यवरांचा यापूर्वी पुण्यभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

जुलै महिन्यात  पुरस्कार वितरणाचा दिमाखदार सोहळा रंगणार असून, एक लाख रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरणाऱ्या बालशिवाजींची प्रतिकृती आणि पुण्याच्या ग्रामदैवतांचे छायाचित्र असलेले स्मृतिचिन्ह हे या पुरस्कारचे वैशिष्ट्य असणार आहे.

 

Exit mobile version