Download App

R Madhavan birthday: आर. माधव कोल्हापुरच्या मुलीच्या प्रेमात कसा पडला; घ्या जाणून Love Story

R Madhavan birthday: ‘रेहना तेरे दिल में’ या सिनेमातून अभिनेता आर. माधवनने (R Madhavan) या तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच मनात स्थान निर्माण केले आहे. गेल्या दोन दशक आर. माधवन आपल्या सर्वांचे निखळ मनोरंजन करत आहे. आज अभिनेता माधवनचा (R Madhavan birthday) 53 वा वाढदिवस आहे. माधवनचे कोल्हापूराशी (kolhapur) काही खास कनेक्शन आहे. काय आहे हे नेमकं कनेक्शन त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

आर. माधवनच कोल्हापूराशी असलेले खास कनेक्शन असण्याच्या पाठीमागचे नेमके कारण म्हणजे त्याची बायको ही मूळची कोल्हापूरची आहे. जेव्हा आर. माधवन यानं मुंबईच्या केसी कॉलेजमधून पब्लिक स्पीकिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केले, त्यानंतर तो कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात शिक्षण घ्यायला गेला होता. यासाठी तो ५ वर्ष कोल्हापूरात होता. त्यावेळी तो राजाराम हॉस्टेल आणि मग राजारामपुरीमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. त्यावेळी त्यानं तिथेच आपलं शिक्षण पुर्ण केल्यावर शिक्षण म्हणून कोल्हापूरात नोकरी करू लागला होता.


त्याने यावेळी कोल्हापूरमध्ये पब्लिक स्पीकिंगचे क्लासेस सुरू केले होते. त्यावेळेस एक कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेतमध्ये त्याची आणि बायको सरिता बिर्जे हिच्याशी भेट झाली होती. सरिता यांना खरेतर हवाईसुंदरी व्हायचे होते, आणि त्यासाठी त्यांनी 1991 मध्ये आर. माधवन यांच्या क्लास लावला होता. त्यानंतर त्यांना या क्लासचा चांगलाच फायदा झाला. यामुळे त्यांना आर माधवन यांना थॅक्स डिनरसाठी घरी बोलावले होते. तिथून त्यांच्या लव्ह स्टोरीला सुरूवात झाली असल्याचे त्यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले होते.

Sirf Ek Banda Kafi Hai: मनोज बाजपेयींचा ‘‘सिर्फ एक बंदा..’ सिनेमा लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर

या भेटीनंतर सरिता आणि माधवन यांच्यामध्ये मैत्री वाढत गेली. पुढे त्याचं रूपांतर प्रेमामध्ये झाले होते. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी 1999 मध्ये लग्न केले आहे. ही गोष्ट आहे आर. माधवन बॉलिवूडमध्ये येण्याअगोदरची. तसेच माधवन नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात, आणि आपल्या चहात्यांना त्याच्या पर्सनल बद्दल अपडेट देत असतो. माधवनचा मुलगा आज क्रीडा क्षेत्रामध्ये देशाचे नाव उंच करत आहे. याबद्दलच्या देखील प्रत्येक अपडेट माधवन आपल्या चाहत्यांना देत असतो.

Tags

follow us