Download App

इर्शाळवाडीतील गावकऱ्यांच्या मदतीला Jui Gadkari आली धावून; पोस्ट शेअर करत म्हणाली…

Jui Gadkari Post: राजगड जिल्ह्यातील खालापूरजवळी इर्शाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या इर्शाळवाडीमधील लोकांसाठी १९ जुलैची रात्र ही शेवटची रात्र ठरली आहे. दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेमुळे अख्ख गाव ढिगाऱ्याखाली अडकले आहे. ३ दिवस झाले आहेत, तरी देखील मृतांचा आकडा वाढत असल्याचे चिट पाहायला मिळत आहे. या दुर्घटनेतील बेपत्ता लोकांचा शोध देखील NDRF टीम घेत आहे.

Jui Gadkari Post

इर्शाळवाडीत अजून देखील बचावकार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेकांनी पोस्ट करत संवेदना व्यक्त करत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय मदतीचा हात देखील सर्वत्र मिळत असल्याचे बघायला मिळत आहे. अभिनेत्री जुई गडकरीने गेल्या काही दिवसांपूर्वी इर्शाळगडावर तिने केलेल्या ट्रेकच्या आठवणी सांगितली आहे. आता अभिनेत्रीने या ठिकाणच्या लोकांसाठी एक मदतीचा हात देणार असल्याची माहिती समोर आली आहे.


जुईने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये असे लिहिले आहे की, ‘इर्शाळवाडीसाठी मदत पाठवायची असेल तर कृपया मला मेसेज करा. पंचे, चादरी, औषधे, कपडे, चपला, जेवण इ. जीवनावश्यक गरजू वस्तू तिथपर्यंत माझ्या टीमकडून पोहोचवल्या जाणार आहेत. अभिनेत्रीने तिच्या पोस्टमधून मदतीने आवाहन केले आहे. सध्या जुईची ही पोस्ट जोरदार चर्चत येत आहे. अभिनेत्रीच्या पोस्टनुसार तिच्या टीमच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना इर्शाळवाडीवासियांना मदत केले जात असल्याचे तिने यावेळी सांगितले आहे. तसेच जुई इर्शाळगड याठिकाणी गेल्या काही दिवसांपूर्वी ट्रेकसाठी गेली होती.

या ट्रेकच्या दरम्यान इर्शाळवाडीतील आठवणी ताज्या केल्या आहेत. तिने त्याठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांच्या हातचं जेवण देखील जेवल्याची आठवण देखील सांगितली आहे. ही बातमी बघताच अभिनेत्रीने याठिकाणी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांसाठी प्रार्थना केल्याचे देखील आपण पाहिले आहात. तसेच शिक्षणासाठी आश्रमशाळा किंवा अन्यत्र असलेल्या मुलांनी आपले आई-वडील गमावले. दोन वर्षांपासून १४-१५ वर्षांपर्यंतची मुले अनाथ झाली. या मुलांच्या वाट्याला आलेल्या वेदना, दुःख सांत्वनापल्याड आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आहे. त्यांच्या आयुष्यात या कठीण आणि परीक्षेच्या काळात पाठीशी ठाम उभे राहण्याची गरज आहे.

Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याने आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे, तर ८६ जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती आहेत. गेल्या ३ दिवसापासून या ठिकाणी अहोरात्र बचावकार्य सुरु असल्याचे दिसून येत आहे. याठिकाणी पर्यटकांच्या गर्दीमुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण होत असल्याचे देखील येत आहे. या वाढणाऱ्या गर्दीमुळे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी निर्बंध घातले आहेत. याठिकाणी पोहोचण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे NDRF आणि प्रशासनाच्या मदत यंत्रणांना जेसीबी किंवा पोकलेन घटनास्थळापर्यंत पोहचणे अशक्य असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान याठिकाणावरुन समोर आलेले विविध फोटो आणि व्हिडिओ एकदम काळजाला भिडणारे आहेत. सध्या NDRF सह अनेक ट्रेकर्स देखील बचावकार्यात सहकार्य करत असल्याचे दिसत आहेत.

Tags

follow us