Download App

Rajinikanth Amitabh New Movie : तब्बल 32 वर्षांनंतर ‘बिग बी’-‘थलायवा’चा जलवा! ‘या’ चित्रपटात दिसणार एकत्र

Rajinikanth Amitabh New Movie : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth Amitabh New Movie) आणि बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना एकाच चित्रपटात पाहण्याची चाहत्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. तब्बल 32 वर्षांनंतर हा खास योग जुळून आला आहे. रजनीकांत लवकरच दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांच्या चित्रलपटात झळकणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चनही असतील अशा चर्चा सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून सुरू होत्या. या चर्चाही खऱ्या असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांच्या थलाईवर 170 या चित्रपटात रजनीकांत यांच्यासह राणा डग्गूबाती, फहाद फाजील दिसणार आहेत. आता या चित्रपटात बिग बी मोठ्या भूमिकेत असतील यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे हिंदी चित्रपट हम नंतर अमिताभ आणि रजनीकांत यांची जोडी तब्बल 32 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

Mahatma Vs Gandhi: राष्ट्रपित्याच्या भूमिकेसाठी बोमन इरानींनी घटवलं ३० किलो वजन’

चित्रपट निर्माते लायका प्रॉडक्शनने याबाबत सोशल मीडियावर माहिती शेअर केली आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन असतील असे संस्थेने म्हटले आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात रजनीकांत पोलीस अधिकाऱ्याच्या भुमिकेत दिसणार आहेत. अमिताभ आणि रजनीकांत यांनी याआधी हम तुम, गिरफ्तार आणि अंधा कानून या हिंदी चित्रपटात काम केले आहे.

यानंतर आता पुन्हा हा योग जुळून आला आहे. तब्बल 32 वर्षांनंतर हे दोन्ही दिग्गज अभिनेते मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. तसेही या दोन्ही महानायकांना एकाच चित्रपटात पाहण्याची चाहत्यांची अनेक दिवसांपासूनची इच्छा आहे. दोन्ही आपापल्या चित्रपट सृष्टीतील बादशाह आहेत. दोघांचीही देशविदेशात प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. त्यांच्या चित्रपटांना गर्दी होतेच. रजनीकांत यांच्या चित्रपटांसाठी तर लोकांची प्रचंड उत्सुकता आणि उत्साह पाहिला आहेच. आता हे दोन्ही कलाकार एकाच चित्रपटात आहेत म्हटल्यानंतर जल्लोष तर होणारच.

दोन्ही अभिनेत्यांची भूमिका असलेला हा चित्रपट कधी रिलीज होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. रजनीकांत यांचा हा 170 वा चित्रपट खासच ठरणार आहे. रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असलेल्या जेलर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवले. त्यानंतर आता त्यांचा लाल सलाम हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags

follow us