Rajinikanth Upcoming Movie: साऊथचा सुपरस्टार थलायवा (Rajinikanth) म्हणजेच चाहत्यांचा लाडका रजनीकांत यांच्या जेलर (Jailer) सिनेमा १० ऑगस्ट दिवशी प्रदर्शित झाला. या सिनेमाला चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. या सिनेमाने ६०० कोटींचे कलेक्शन केल्याचे बघायला मिळाले आहे. जगभरात या सिनेमाची क्रेझ सध्या सर्वत्र बघायला मिळत आहे. (Social media) नुकताच हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. जेलर सिनेमाला प्रदर्शित होऊन एक महिना देखील झाला नाही, तोपर्यंतच थलायवा यांच्या आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे.
https://x.com/sunpictures/status/1701105843025137758?s=20
थलायवा यांचा आगामी सिनेमा लोकेश कनगराज यांनी लिहिला आहे. तसेच तेच हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहे. या सिनेमाच्या घोषणेने थलायवा यांचे चाहते मात्र जोरदार खुश झाल्याचे बघायला मिळत आहे. लोकेश कनगराज सध्या त्यांचा सिनेमा ‘लियो’च्या प्रदर्शितसाठी सज्ज आहे. तसेच त्यांच्या या सिनेमामध्ये साऊथ सुपरस्टार दलपती विजय देखील बघायला मिळणार आहे. तर दुसरीकडे थलायवा देखील त्यांच्या जेलरच्या यशाचा आनंद घेत आहेत. तर आता थलायवा आणि लोकेश कनगराज त्यांच्या आगामी प्रोजेक्टसाठी पुन्हा एकदा एकत्र बघायला मिळणार आहे.
सन पिक्चरने ट्विटरवर (एक्स) पोस्ट करत थलायवा आणि लोकेश कनगराज यांच्या आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. कलानिधी मारन सादर करत असलेल्या या सिनेमाचे तात्पुरते नाव ‘थलाईवर 171’ असे ठेवले असल्याचे यावेळी सांगितले आहे. कारण थलायवा यांचा हा 171 वा सिनेमा आहे. सन पिक्चर्सने केलेल्या घोषणेत असे लिहिले आहे की, “सुपरस्टार थलायवा यांच्या ‘थलाईवर 171’ ची घोषणा करत असताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शिक लोकेश कनगराज हे आहेत.
katrina kaif: कैटरीना कैफ ठरली इतिहाद एअरवेजची ब्रँड अँम्बेसेडर !
तसेच लोकेश 2023 मध्ये विजय आणि तृषा कृष्णन अभिनीत ‘लिओ’, 2022 मध्ये कमल हासन आणि विजय सेतुपती अभिनीत ‘विक्रम’ आणि कार्ती अभिनीत ‘कैथी’ सारख्या काही मेगा-यशस्वी सिनेमाच्या दिग्दर्शनासाठी कायम ओळखले जात असतात. मात्र 2023 मध्ये आलेल्या ‘भोला’ या सिनेमात त्यांनी बॉलिवूड स्टार अजय देवगणबरोबर काम केले आहे. थलायवाबद्दल सांगायचं झालं तर १० ऑगस्टला प्रदर्शित झालेला ‘जेलर’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी ठरला आहे. सन पिक्चर्सच्या बॅनरखाली कलानिधी मारन निर्मित आणि नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित ‘जेलर’मध्ये थलायवासोबत रम्या कृष्णन, योगी बाबू, विनायकन, तमन्ना भाटिया आणि मास्टर ऋत्विक यांच्या प्रमुख भूमिका बघायला मिळत आहे. तसेच मोहनलाल, शिव राजकुमार आणि जॅकी श्रॉफ यांनी या सिनेमात कॅमिओ केला होता.