Rajkumar Rao On Shrikanth Movie: राजकुमार रावच्या (Rajkumar Rao) आगामी ‘श्रीकांत’ (Shrikanth Movie) सिनेमाची उत्सुकता चांगलीच शिगेला आहे. या सिनेमात अंधत्वावर मात करुन उद्योगपती झालेल्या श्रीकांत बोल्ला यांची कहाणी बघायला मिळणार आहे. (Shrikanth Bolla Biopic) सर्वाधिक पॉवर-पॅक परफॉर्मर राजकुमार राव एक कलाकार म्हणून आपली क्षमता सिद्ध करण्यात कधीही अपयशी ठरला नाही. त्याच्या अभिनयामुळे हा अभिनेता चित्रपट निर्मात्यांना आउट-ऑफ-द-बॉक्स चित्रपटांमध्ये विशेषतः बायोपिकमध्ये कास्ट करण्यासाठी सर्वोच्च पसंती बनला यात शंका नाही.
बोस, डेड,अलाइव्ह’मध्ये प्रतिष्ठित भारतीय स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची व्यक्तिरेखा साकारण्यापासून ते ‘शाहिद’मध्ये मानवाधिकार कार्यकर्ते शाहिद आझमी यांच्या संघर्षांना जिवंत करण्यापर्यंत राजकुमार रावने कायम त्याचा पवादात्मक प्रतिभा मधून प्रेक्षकांचं कायम मनोरंजन केले आहे. एका मुलाखतीमध्ये राजकुमार म्हणाला की, “बायोपिक बनवणे खूप जोखमीचे काम आहे. कारण यात काम करण जबाबदारीपेक्षा बायोपिकमधील त्याच्या भूमिकेला न्याय देणे हे प्रत्येक अभिनेत्याचे कर्तव्य आहे. जर आपण चुकलो तर एक मोठी चूक होऊ शकते म्हणून बायोपिक करणं हे एक मोठं कर्तव्य आहे, असं यावेळी अभिनेत्याने सांगितले आहे.
Sukh Kalale : मिथिलाला सरप्राईज करण्यासाठी माधवने घेतली मधुराज रेसिपीची मदत
श्रीकांतला त्याच्या प्रवासात त्याच्या शिक्षिका कायम साथ देताना दिसत आहेत. अंधत्वावर मात करुन श्रीकांत व्यवसाय सुरु करतो. आणि त्यात खूपच उत्तम प्रकारे यशस्वी होतो. ‘श्रीकांत’ सिनेमाचा हा ट्रेलर खुप प्रेरणादायी स्वरूपात बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे मुख्य भूमिकेत भरत जाधव आणि शरद केळकर हे मराठमोळे कलाकार देखील बघायला मिळतात. अभिनेत्री आलिया देखील सिनेमात झळकणार आहे. राजकुमारचा अभिनय अंगावर काटा आणणारा आहे.
राजकुमार राव पुन्हा एकदा त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो ‘श्रीकांत’, या चित्रपटांमध्ये 10 मे रोजी दिसणार असून प्रेक्षकांना पुन्हा एकदा मनोरंजन देण्यासाठी सज्ज होत आहे.