Rakhi Sawant : राखी सावंतचे धक्कादायक विधान; म्हणाली, “आदिल तुरुंगात मला… ”

Rakhi Sawant Blamed Adil Khan : बॉलिवूडची ड्रामाक्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंतने (Rakhi Sawant) आता आदिल खान दुर्रानीवर (Adil Khan Durrani) नवा आरोप केला आहे. राखी म्हणाली आहे की, आदिल खान दुर्रानीने हा तिला मारण्याचा कट रचत आहे. तो तुरुंगामध्ये असल्याने त्याने एका व्यक्तीला मला मारण्याची सुपारी दिली आहे. राखीचा पती आदिल हा हा […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 16T155421.110

Rakhi Sawant

Rakhi Sawant Blamed Adil Khan : बॉलिवूडची ड्रामाक्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंतने (Rakhi Sawant) आता आदिल खान दुर्रानीवर (Adil Khan Durrani) नवा आरोप केला आहे. राखी म्हणाली आहे की, आदिल खान दुर्रानीने हा तिला मारण्याचा कट रचत आहे. तो तुरुंगामध्ये असल्याने त्याने एका व्यक्तीला मला मारण्याची सुपारी दिली आहे.

राखीचा पती आदिल हा हा सध्या म्हैसूरच्या तुरुंगात आहे. राखी सावंतला मारहाण केल्याप्रकरणी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान राखी सावंतच्या नव्या स्फोटामुळे जोरदार खळबळ उडाली आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये ड्रामाक्वीने सांगितले आहे की शत्रूंपासून बचाव करण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करत आहे. आदिल मला मारण्याचा कट रचत आहे. तो तुरुंगात असल्याने त्याने एका व्यक्तीला मला मारण्याची सुपारी दिली असल्याचे ड्रामाक्वीने सांगितले आहे.


ड्रामाक्वी पुढे म्हणाली आहे की, अल्ला माझ्या प्रार्थनेचा नक्कीच स्वीकार करणार आहे. आदिल मला मारू शकत नाही. माझा बदला घेण्यासाठी त्याला मला मारायचं आहे. मला तो सतत न चुकता फोन करतो आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला परत घेऊन जा, असं म्हणतो. यावर त्याला मी सांगितले आहे की, ‘मी तुला माफ केले आहे. परंतु तू माझ्यापासून दूर राहा.

ड्रामाक्वीला एक व्हॉईस नोट देखील मिळाली आहे. यामध्ये एक व्यक्ती म्हणत आहे की, मला जे कळालं आहे त्यानुसार, आदिलने तुला मारण्याचा कट रचला आहे. तसेच या महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये आदिलला जामीन मिळू शकणार आहे, असा दावाही त्या व्यक्तीने केला आहे. ड्रामाक्वीने गेल्या काही दिवसाअगोदर आदिलची भेट घेतली होती. या भेटीच्या दरम्यान आदिल खान तिला म्हणाला आहे की, आज मी तुरुंगात आहे.

Cannes Film Festival 2023 : ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ला आजपासून सुरुवात; ‘या’ अभिनेत्रीचा रेड कार्पेटवर डेब्यू!

यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकणार आहे. आर्थर रोड तुरुंगासारखं घाणेरडं तुरुंग मी आजवर बघितले नाही. इथे अक्षरशः मी भांडी घासली आहेत. लोकांसाठी चहा बनवला आहे. त्यांचे पाय चेपून दिले आहेत. मला लॉकअप मध्ये अक्षरशः मारहाण देखील करण्यात आली आहे. यासर्व गोष्टींचा बदला घ्यायला मी पुन्हा येणार आहे. लवकरच माझी यातून सुटका होणार आहे. मग बघ तुझं काय होणार आहे. मारहाण, फसवणूक आणि लैंगिक अत्याचार करायचा, असा आरोपही ड्रामाक्वीने आदिलवर केला आहे.

Exit mobile version