Download App

राखी सावंतच्या भावाला मुंबई पोलिसांकडून अटक, 22 मे पर्यंत कोठडीत रवानगी

Rakhi Sawant Brother Rakesh Sawant Arrested: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. काही काळापूर्वी राखीने पती आदिल दुर्रानीवर (Adil Durrani) घरगुती हिंसाचार, चोरी, फसवणूक असे अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आदिलवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. त्याचवेळी राखीचा भाऊ राकेश सावंत याच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.

चेक बाऊन्स प्रकरणी राखी सावंतचा भाऊ राकेश सावंत याला अटक करण्यात आली आहे. राकेशला ओशिवरा (mumbai police) पोलिसांनी 7 मे रोजी अटक केली होती. त्यानंतर त्याला ८ मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. तेथून राखीचा भाऊ राकेशला आता 22 मे पर्यंत कोठडीत पाठवण्यात आले आहे. राकेश एक दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक आहेत.

अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानींची झेप, गौतम अदानी आणखी घसरले

मिळालेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये एका व्यावसायिकाने राकेशविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी राखीच्या भावालाही जामिनावर सोडण्यापूर्वी अटक करण्यात आली होती. त्याचवेळी, चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी न्यायालयाने त्याला व्यावसायिकाला पैसे परत करावेत, या अटीसह जामीन दिला होता आणि राकेश त्यात अपयशी ठरला. आता याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला 22 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

https://youtu.be/-iRiV9C-LsY

Tags

follow us