अभिनेत्री रकुल प्रीत सिंग ( Rakul Preet Singh ) हीचे अलिकडे कंडोम ( Condom ) विषयचे एक विधान चर्चेत आले आहे. त्यावर अनेक लोक सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. रकुल प्रीतचा छत्रीवाली ( Chhatriwali ) हा सिनेमा काही दिवासंपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा कंडोम वापरण्याविषयी लोकांमध्ये जनजागृती करतो. यावेळी तिने एका मुलाखतीमध्ये कंडोम वापरण्याविषयी भाष्य केले आहे.
छत्रीवाली हा एक सामाजिक चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये लैंगिक विषयांवर भाष्य केले आहे. आपल्याकडे महिलांच्या आरोग्याला कायम दुय्यम स्थान दिले जाते. कंडोन न वापरल्याने महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, हेच आपल्याकडच्या लोकांना माहिती नाही आहे. लोकांना कंडोम वापरायचे नाही, असं नाही. पण त्यांना त्याचा वापर का करायचा तेच माहित नाही आहे. याविषयी महिलांना देखील फार ज्ञान नाही आहे, असे रकुल म्हणाली आहे.
(बर्लिनमध्ये मराठी सिनेमासाठी टाळ्यांचा कडकडाट, लेखिकेने शेअर केला अनुभव)
तसेच आपल्या देशात फक्त 5 टक्के लोकच कंडोम वापरतात. त्यामुळे या विषयांवर भाष्य करणारे सिनेमे जेवढे येतील तेवढे कमी आहेत. आपण आपल्या महिलांच्या आरोग्याच्या नीट विचार नाही करत आहोत, हे प्रत्येकाला कळायला हवे, असे रकुलने सांगितले.
दरम्यान गेल्या 2-3 वर्षात बॉलिवुडमध्ये वेगळ्या विषयांवर भाष्य करणारे सिनेमे आहेत. याआधी हेल्मेट व जनहित में जारी हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले होते. या सिनेमांमधून देखील कंडोम वापरण्याविषयी जनजागृती करण्यात आलेली आहे. त्याचा वापर न केल्यास वाढती लोकसंख्या व महिलांच्या आरोग्यावर होणारे परिणाम या समस्या सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्यात आल्या आहेत.