Download App

राखी सावंतच्या मदतीला रामदास आठवले

  • Written By: Last Updated:

मुंबई – प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) यांचे आदिल खान (Adil Khan) यांच्या सोबत लग्न झाले होते मात्र लग्नानंतर आदिल खान यांनी राखी सावंत यांच्यावर अत्याचार आणि घोर अन्याय केला आहे. याच्या निषेधार्थ उद्या (16 फेब्रुवारी) रिपब्लिकन पक्षाच्या (RPI) वतीने ओशिवरा पोलीस ठाणे जोगेश्वरी पश्चिम येथे आरोपी आदिल खान याच्या विरुद्ध निषेध आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनी दिली आहे. 

सुप्रसिध्द अभिनेत्री राखी सावंत या रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आहेत. त्यांचे आदिल खान यांच्या सोबत लग्न झाले होते.मात्र कौटुंबिक हिंसाचार, मारहाण, अत्याचार आणि अन्याय आदिल खान याने राखी सावंत यांच्यावर केला असल्याची राखी सावंत यांची तक्रार आहे.

बाळासाहेब थोरातांचे ना पत्र, ना राजीनामा; Nana Patole यांनी केला खळबळजनक दावा..

अत्यंत वाईट वर्तणूक आणि कृत्य आदिल खान याने केल्याची माहिती राखी सावंत यांनी दिली असून त्यानुसार नराधम आरोपी आदिल खान याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाच्या वर्सोवा तालुक्याच्या वतीने रिपाइंचे वर्सोवा तालुका अध्यक्ष सुनिल पवार, जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव, किशोर मासुम, जयंती गडा यांच्या नेतृत्वात ओशिवरा पोलीस ठाणे येथे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. 

Tags

follow us