Download App

Animal Advance Booking: रिलीज होण्याआधीच ‘ॲनिमल’ने जमवला एवढ्या कोटींचा गल्ला

Animal Advance Booking : ‘अजून एक दिवस… ‘ रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि बॉबी देओल (Bobby Deol) मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. मात्र, प्रदर्शित होण्याआधीच अॅनिमलची (Animal Movie) सर्वत्र जोरदार बोलबाला बघायला मिळत आहे. रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या ट्रेलरमुळे मोठी खळबळ उडवून दिली आहे. चाहते सध्या या जोडीला एकत्र पाहण्यासाठी खूप आतुरतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. यासाठी अॅनिमलची संपूर्ण टीम प्रमोशन करताना दिसत आहे आणि चित्रपटाला त्याचे फायदे देखील होत आहेत. अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत रणबीर कपूरच्या अॅनिमलने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. तसेच अॅनिमल आता एका अनोख्या दिशेने जाताना दिसत आहे.


अॅनिमल सिनेमाला प्रेक्षकांचा एवढा प्रतिसाद पाहून पहिल्याच दिवशी हा चित्रपट उत्तम कलेक्शन करेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, चित्रपटाने 5 दिवसातच केलेला आकडा लक्षात घेता आणि अजून एक दिवस बाकी आहे, तर ओपनिंगने 50 कोटींचा आकडा पार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रणबीर कपूरचा चित्रपट अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत जोरदार कमाई करत असल्याचे दिसत आहे. मात्र, ट्रेलरमध्ये रणबीर आणि बॉबीने एकत्र निर्माण केलेला सस्पेन्स… चित्रपटासाठी खूप फायदेशीर ठरला आहे. SACNILC च्या अहवालानुसार, चित्रपटाची आतापर्यंत 6 लाख 20 हजार 318 तिकिटे विकली गेली आहेत. हे कलेक्शन केवळ 5 दिवसांसाठी आहे, कारण निर्मात्यांनी 25 नोव्हेंबरपासूनच आगाऊ बुकिंग सुरू केले आहे. आणि सध्या बुकिंग पहिल्या दिवसासाठी केली जात आहे.

रणबीर कपूरच्या अ‍ॅनिमलकडून ज्या मार्गावर अपेक्षा होती, त्याच मार्गावर हा चित्रपट वाटचाल करत आहे. 6 लाखांहून अधिक तिकिटांची आगाऊ बुकिंग करून विक्री झाली आहे. दुसरीकडे आतापर्यंत 16.55 कोटी रुपयांची कमाई केली आहे. जे चौथ्या दिवशी फक्त 12.21 कोटी रुपये होते. चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून एक दिवस बाकी आहे, त्यामुळे बुकिंग कलेक्शन 20 कोटींच्या आसपास राहिल्यास ओपनिंग 50 कोटींहून अधिक होणार हे निश्चित असणार आहे.

Dance Plus Season: देशातील सर्वात लोकप्रिय डान्स रिअ‍ॅलिटी शो लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

गेल्या काही महिन्यापासून बॉलीवूडकरांचे खूप चांगले दिवस आले आहेत. बॉक्स ऑफिसवर जेवढी धमाल होती, तेवढीच चित्रपटांनी जगभरात चांगली कमाई केली आहे. याची सुरुवात शाहरुख खानच्या पठाणपासून सुरु झाली आहे, ज्याने जगभरात 1000 कोटींचा व्यवसाय केला आहे.

त्यानंतर सनी देओलच्या गदर-2 आणि पुन्हा एकदा शाहरुख खानच्या जवानने खूप मोठा वादळ निर्माण केला आहे. मात्र, ३१ डिसेंबरनंतरही अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. पण रिलीजपूर्वीच एवढी लोकप्रिय झालेली रणबीर कपूर आणि बॉबी देओलची ही जोडी सनी देओल आणि शाहरुख खानचा लवकरच रेकॉर्ड मोडू शकणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us