Download App

Ranbir Kapoor च्या अ‍ॅनिमलची जादू! 2 दिवसांत केली लाखोंची अ‍ॅडव्हांन्स बुकींग

  • Written By: Last Updated:

Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज झाला, ज्यामध्ये रणबीर जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसत होता. यामध्ये त्याची जोडी साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत (Rashmika Mandanna)आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) यांनी केले आहे. तर आता या चित्रपटाने आणखी एक विक्रम केला आहे.

2 दिवसांत केली लाखोंची अ‍ॅडव्हांन्स बुकींग…

नुकतच रणबीर कपूरच्या अ‍ॅनिमल चित्रपटाची अ‍ॅडव्हांस तिकीट बुकींग सुरू झाली आहे. त्यामध्ये या चित्रपटाने जादूई कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट रग्गड कमाई करणार असल्याचं बोललं जात आहे. तसेचं हा चित्रपट रणबीरच्या करिअर मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरू शकतो. असं देखील बोललं जात आहे.

‘…तर भुजबळांनी जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारावा’; मराठा-ओबीसी वादात शंभूराज देसाईंची उडी

मिळालेल्या महितीनुसार सोमवारी म्हणजे आज सकाळपर्यंत या चित्रपटाचे 2 लाखांहून अधिक तिकीट बुकींग झाले आहेत. तर आतापर्यंत या चित्रपटाने तब्बल 7 कोटींच्या जवळपास एकुण कमाई केली आहे. तसेच शुक्रवार जसं जसा जवळ येत आहे. तसं तसं अ‍ॅडव्हांस तिकीट बुकींगचा वेग वाढला आहे.

Uttarkashi Tunnel Accident: उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेत अदानींचा काय संबंध? अदानी समुहाकडून स्पष्टीकरण

ट ‘अ‍ॅनिमल’ (Animal Movie) हा 2023 च्या मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे आणि चाहते त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. ( Animal Trailer Out) अशा परिस्थितीत चाहत्यांची उत्कंठा वाढवत निर्मात्यांनी ‘अ‍ॅनिमल’चा ट्रेलर रिलीज केला आहे. रणबीर कपूरचा इंटेन्स लूक खूपच प्रभावी आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर रणबीर कपूरने ‘अ‍ॅनिमल’साठी आपले सर्वस्व पणाला लावल्याचे बघायला मिळत आहे. या ट्रेलरमध्ये बापासाठी मुलगा जग पेटवायला निघाला असल्याचे दिसत आहे.

Tags

follow us