Ranbir Kapoor On Ramayan: गेल्या वर्षी रिलीज झालेल्या ‘ॲनिमल’मध्ये रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूपचं कौतुक झाले होते. यानंतर तो आता नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ (Ramayan) या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्यासोबत साई पल्लवी आई सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय KGF स्टार यश या चित्रपटात रावणाची भूमिका साकारताना दिसणार असल्याची बातमी होती. तर सनी देओल आणि लारा दत्ता सारखे कलाकार हनुमान आणि कैकेयीच्या भूमिकेत दिसणार आहेत. पण आता या सिनेमाबाबत मोठी माहिती समोर आली, रणबीर आणि सई वगळता इतर काही कलाकार नसल्याची माहिती समोर आली.
दिग्दर्शक नितेश तिवारी हा चित्रपट तीन भागात बनवणार असल्याचे बोलले जात होते. यामध्ये पहिला भाग बनवला जाईल. त्याची कथा फक्त रणबीर कपूर आणि सई पल्लवी यांच्याभोवती फिरणार आहे. त्याचा शेवट सीतेच्या अपहरणाने होईल. यात हनुमान आणि रावणाची पात्रे फार मोठी नसतील. रणवीर आणि सई एप्रिल आणि मे महिन्यात चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत, आणि 2 महिने शूटिंग करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यशबद्दल अशी बातमी होती की रावणाची भूमिका साकारणारा यश नितीश तिवारींच्या चित्रपटासाठी 15 दिवस शूट करणार आहे, जो या वर्षी जून किंवा जुलै महिन्यात येणार आहे.
यानंतर आणखी एक नवीन माहिती आली की चित्रपट निर्माते ‘रामायण’च्या पात्राच्या पोशाखावर काम करत आहेत. कारण या चित्रपटात कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘डून’ सारख्या चित्रपटांसाठी VFX बनवणारा DNEG ‘रामायण’वर काम करणार, असेही सांगण्यात आले आहे. मात्र या सर्व बातम्या अफवा असल्याचे सांगितलं जात आहे. आता या चित्रपटाबाबत नवीन माहिती समोर आली आहे. बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, असे म्हटले जात आहे की, चित्रपट निर्मात्यांमधील परस्पर मतभेदांमुळे ‘रामायण’ पुढे ढकलण्यात येणार आहे.
Mirzapur 3: मुन्ना भैया ‘मिर्झापूर 3’ मध्ये दिसणार नाही, कारण आलं समोर
परस्पर समस्या सोडवल्यानंतरच चित्रपट निर्माते ‘रामायण’वर काम सुरू करणार आहेत. पण नितीश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला हा चित्रपट थांबला आहे असे नाही. हे काम काही काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे ‘रामायण’चे शूटिंग यावर्षी सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या चित्रपटातील इतर कोणते कलाकार असणार आहेत, या चित्रपटाच्या उर्वरित स्टारकास्टबाबत चित्रपट निर्मात्यांनी अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.