R Madhavan: बॉलिवूड म्हटलं की रोमँटिक सिनेमा आलाच आणि रोमँटिक सिनेमा म्हटलं की शाहरूख, सलमान, हृतिक, आमीर हे अभिनेते डोळ्यासमोर येतात. जेव्हा बॉलिवूडमध्ये या अभिनेत्यांच्या सिनेमाचा दबदबा होता तेव्हाच आणखी एका सिनेमानं प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तो सिनेमा म्हणजे ‘रहना है तेरे दिल में’. या सिनेमातली गाणी असोत किंवा पावसाचा सीन असो आजही प्रेक्षकांच्या मनातून त्याची भुरळ गेलेली नाही.
“रेहना है तेरे दिल में… ” मधील त्याच्या यशस्वी भूमिकेपासून ते तनु वेड्स मनू आणि रंग दे बसंती सारख्या चित्रपटांमधील त्याचे अभिनायचे बारकावे जपत त्याने कायम उत्तम काम केलं. सहकलाकारांसोबत एक उल्लेखनीय केमिस्ट्री निर्माण करून त्याने काम करत आपल्या अभिनयाची जादू कायम दाखवली आहे.
रेहना है तेरे दिल में मधील दिया मिर्झा सोबतची मनमोहक केमिस्ट्री असो, तनु वेड्स मनू मधील कंगना राणौत सोबत शेअर केलेली स्क्रीन असो किवा अलई पयुथे मधील शालिनीसोबत शेअर केलेली आकर्षक उपस्थिती असो त्याची केमिस्ट्री नेहमीच लक्षवेधी ठरला आहे. रहना है तेरे दिल में ची क्रेझ मधल्या काळात अनेक तमिळ, कन्नड आणि हिंदी भाषेतल्या प्रोजेक्टवर काम केल्यावर 2001 ला माधवनला ‘रहना है तेरे दिल में’ मिळाली. या सिनेमात माधवनला दिया मिर्झा सोबत प्रमुख भूमिका होती. मिन्नाले नावाच्या तमिळ सिनेमाचा हा रिकेम होता. या तमिळ सिनेमातही आर. माधवननेच काम केलं होतं.
Box Office Collection: ‘बॉक्स ऑफिस कलेक्शन; कोण हिट कोण फ्लॉप..? लगेच जाणून घ्या…
“रहना है तेरे दिल में”ला बॉक्स ऑफिसवर अपयश मिळालं होतं, पण पुढे जेव्हा हा सिनेमा टीव्हीवर लागायला लागला तेव्हापासून तरूणांमध्ये या सिनेमाची क्रेझ जास्तच वाढली. तरूणांना त्यांचा नवा रोमँटिक हिरो मिळाला होता. या सिनेमातल्या दिया आणि माधवनच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंत केलं. या सिनेमातली गाणी तर आजही सगळ्यांच्या आवडीची आहेत. ऑन-स्क्रीन हिरो म्हणून त्यांचा वारसा भारतीय चित्रपटसृष्टीचा अविभाज्य भाग आहे. हा अभिनेता लवकरच शशिकांतच्या आगामी क्रिकेट ड्रामामध्ये दिसणार असून नयनतारा, सिद्धार्थ आणि मीरा जास्मिन यांच्यासोबत टेस्टमध्ये दिसणार आहे.