भारतामध्ये 2018 साली ‘मी टू’ ( Me Too ) आंदोलन सुरु झाले होते. अभिनेत्री तनुश्री दत्ताने ( Tanushree Datta ) या प्ररणाची सुरुवात केली होती. या आंदोलनामध्ये महिलांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी झालेल्या शोषणाबाबात माहिती दिली होती. त्यांना कामाच्या ठिकाणी कशा प्रकारे वाईट गोष्टींना सामोरे जावे लागते याची आठवण त्यावेळी अनेक अभिनेत्रींनी सांगितली होती.
आता या प्रकरणावर अभिनेत्री रेणुका शहाणे ( Renuka Shahane ) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी टू आंदोलनाच्या वेळेस अनेक महिलांना चूप राहण्यसाठी सांगण्यात आले होते. यावर त्यांनी भाष्य केले आहे. आपल्याकडे लहाणपणापासूनच महिलांना गप्प बसण्याची सवय लावण्यात येते, असे त्या म्हणाल्या आहेत. पिंकविला यांच्याशी बोलताना त्यांनी ही बाब सांगितली.
Budget Session: ‘त्या’ बॅनरवरुन मुख्यमंत्र्यांचे राष्ट्रवादीला चिमटे, ‘एकदा ते ठरवा’
आपल्याकडे तुम्ही बोलू नका अशी सवय लहाणपणापासूनच मुलींना लावण्यात येते. मी टू हे आंदोलन अत्यंत महत्वपूर्ण होते. या आंदोलनामुळे किमान महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यामुळे अनेक महिला सामुहिक भावनेतून व्यक्त झाल्या. त्यांच्यासोबत जो प्रसंग 10 अथवा 25 वर्षांपूर्वी घडला त्याला या आंदोलनामुळे वाचा फुटली, असे त्या म्हणाल्या. यावर काही जण महिलांना विचारतात की 25 वर्षानंतर का बोलता? यावर ‘तुम्ही बोलू कुठं देता’? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी संपूर्ण समाज व्यवस्थेवर टीका केली आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, जर एखादी महिला बुद्धीवान असेल तर अनेक पुरुष लोकांना ते आवडत नाही. त्यांचा अहंकार दुखावतो. एखादी महिला जर प्रश्न विचारत असेल तर तिला विचारले म्हटले जाते की, खुप प्रश्न विचारते. याऊलट जर पुरुष प्रश्न विचारत असेल तर लोक म्हणतात की खुप प्रेरणादायी व बुद्धीवान माणुस आहे, अशा शब्दात रेणुका शहाने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.