Parineeti Chopra: परिणीती आणि राघव चड्ढाचा झाला साखरपुडा? अंगठी पाहून चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

Parineeti Chopra and Raghav Chadha : अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्या नात्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चा होत आहेत. दोघे एकमेकांना डेट करत आहेत, लवकरच ते लग्न करणार आहेत, अशा बातम्या येत आहेत. राघव यांनी तर तुम्हाला लवकरच सेलिब्रेशनची संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 18T150914.669

Parineeti Chopra

Parineeti Chopra and Raghav Chadha : अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्या नात्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चा होत आहेत. दोघे एकमेकांना डेट करत आहेत, लवकरच ते लग्न करणार आहेत, अशा बातम्या येत आहेत. राघव यांनी तर तुम्हाला लवकरच सेलिब्रेशनची संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.


आता परिणीतीच्या हातातील अंगठीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. परिणीती बऱ्याचदा विमानतळावर दिसत आहे. दिल्ली आणि मुंबई विमानतळावर अनेकवेळा तिला पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अनेकवेळा ती आणि राघव एकत्र दिसून आले आहेत, अशातच तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तिच्या हातात अंगठी असल्याचे दिसून येत आहे. तिच्या हातामधील अंगठी बघून त्यांनी एंगेजमेंट केली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.या व्हायरल व्हिडीओने परिणीती कॅज्युअल शर्ट आणि जीन्स घालून येत असल्याचे दिसत आहे. ती गाडीत जात असताना तिच्या डाव्या हाताच्या बोटात अंगठी दिसत आहे. यामुळे तिची एंगेजमेंट झाली असावी, अशी चर्चा सध्या जोर धरत आहे.

Madhuri Dixit: माधुरी, मुंबई अन् वडापाव; Appleचे सीईओ टीम कुकनेही मारला प्लेटवर ताव

नेमकं काय आहे प्रकरण ?

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून आपचे खासदार राघव चढ्ढा आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा यांच्या वाढत असलेल्या गाठीभेटींमुळे ते लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार का ? याची चर्चा सुरू झाली आहे. परिणिती चोपडा आणि प्रियंका चोपडा या चुलत बहिणी आहेत. यामुळे प्रियंकाच्या या भारतभेटीमध्ये परिणीतीचे शुभामंगल आटोपलं जाणार का ? याची देखील आता चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. राघव चढ्ढा आणि परिणिती यांच्याकडून त्यांच्या या लग्नाच्या चर्चांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दोघांनी दिली नाही.

Exit mobile version