‘वेड’ची दुसऱ्या आठवड्यातही कमाईची घोडदौड

मुंबई : अभिनेता रितेश देशमुखनं दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट ‘वेड’ला संपूर्ण महाराष्ट्रानं आपली पसंती दर्शवली आहे. वेड चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बक्कळ कमाई करताना दिसून आलाय. ‘वेड’नं आत्तापर्यंत कोट्यावधींची कमाई केली आहे. या चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी दोन कोटी 25 लाख रुपयांची कमाई केली. त्यानंतर पहिल्या आठवड्यात 20.67 कोटींचा गल्ला कमावल्याचं आपण पाहिलंय. या चित्रपटानं […]

Untitled Design (56)

Untitled Design (56)

मुंबई : अभिनेता रितेश देशमुखनं दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट ‘वेड’ला संपूर्ण महाराष्ट्रानं आपली पसंती दर्शवली आहे. वेड चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बक्कळ कमाई करताना दिसून आलाय. ‘वेड’नं आत्तापर्यंत कोट्यावधींची कमाई केली आहे. या चित्रपटानं प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी दोन कोटी 25 लाख रुपयांची कमाई केली. त्यानंतर पहिल्या आठवड्यात 20.67 कोटींचा गल्ला कमावल्याचं आपण पाहिलंय.

या चित्रपटानं प्रदर्शनाच्या दहाव्या दिवशी रविवारी 5.70 कोटींची कमाई केल्याचं दिसून आलंय. मराठी चित्रपटातील आजपर्यंतची रेकॉर्डब्रेक कमाई करत रितेश देशमुखच्या वेड चित्रपटानं नागराज मंजुळे यांच्या सैराट या चित्रपटालाही मागं टाकलंय.

वेड चित्रपटाची महाराष्ट्रात दुसऱ्या आठडव्यातही घोडदौड सुरु आहे. दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटानं 20.18 कोटी रुपयांची बक्कळ कमाई केल्याचं पाहायला मिळतंय. दोन्ही आठड्यात मिळून वेड चित्रपटानं 40 कोटींचा टप्पा पार केलाय.

वेड चित्रपटाचा गल्ला असाच वाढत राहिल्यास काही दिवसांमध्ये हा चित्रपट सैराट चित्रपटाचाही 100 कोटींचा विक्रम मोडीत काढण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यानंतर आता रितेश देशमुखनं एक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

Exit mobile version