Download App

रितेश-जेनेलियाची केमिस्ट्री पुन्हा दिसणार; ‘तुझे मेरी कसम’ 21 वर्षांनी पुन्हा एकदा प्रदर्शित होणार

Riteish Deshmukh Genelia D'souza Movie : अभिनेता रितेश देशमुखने बॉलिवूडमध्ये 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

Riteish Deshmukh Tujhe Meri Kasam Movie : महाराष्ट्रातील सिनेप्रेमींचे लाडके दादा-वहिनी मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा-देशमुख (Genelia Deshmukh) यांनी एकत्र काम केलेला पहिला सिनेमा ‘तुझे मेरी कसम’ पुन्हा (Tujhe Meri Kasam Movie) एकदा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अभिनेता रितेश देशमुखने बॉलिवूडमध्ये ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता हा सिनेमा तब्बल 21 वर्षांनी पुन्हा एकदा रि- रिलीज करण्यात येत आहे. अभिनेता रितेश देशमुखने आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून ही माहिती दिली. हा चित्रपट 13 सप्टेंबर दिवशी प्रदर्शित होणार आहे.


सध्या काही जुने गाजलेले बॉलिवूड सिनेमा पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित केले जात आहे. या प्रयोगाला मोठा प्रतिसाद मिळत असून सिनेप्रेमी या सिनेमासाठी गर्दी करत आहेत. आता, रितेशचा पहिला सिनेमा ‘तुझे मेरी कसम’ पुन्हा एकदा रिलीज होणार आहे. ‘तुझे मेरी कसम’ हा सिनेमा 3 जानेवारी 2003 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. कॉलेजवयीन तरुणाची प्रेमकथा यामध्ये होती. या सिनेमाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. शिवाय, गाणी देखील खूप लोकप्रिय झालेली. रामोजी राव हे या सिनेमाचे निर्माते होते. तर, के. विजय भास्कर यांनी ‘तुझे तेरी कसम’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली होती.

सिनेमागृहात होणार री- रिलीज

‘तुझे मेरी कसम’ हा सिनेमा टीव्हीवर अथवा ओटीटीवर रिलीज करण्यात आला नाही. हा सिनेमा थिएटरमध्येच रिलीज करण्यात आला होता. सिनेमाचे सॅटेलाईट अथवा डिजीटल हक्कांची विक्री निर्मात्यांनी केली नाही. त्यामुळे हा सिनेमा टीव्ही चॅनेल अथवा ओटीटीवर प्रसारीत करण्यात येणार नाही.

Riteish Deshmukh, Genelia D Souza: ‘तुम्हारे बारे में सोचता कौन है? रितेश अन् जिनिलियाच्या ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

रितेश-जेनेलियासाठीही खास आहे सिनेमा

हा सिनेमा रितेश-जेनेलियासाठी खूप खास आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यान त्यांच्यात प्रेम जुळले होते. त्यानंतर जवळपास 10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी 2012 मध्ये त्या दोघांनी लग्नगाठ बांधली. ‘तुझे मेरी कसम’ सिनेमात रितेश देशमुख, जेनेलिया डिसुझा यांच्यासह श्रिया सरन, सतीश शहा, सुप्रिया पिळगावंकर, सुषमा सेठ, शक्ती कपूर, असरानी, जसपाल भट्टी आदींच्या महत्वाच्या भूमिका आहेत.

follow us