रितेश देशमुखचा तेलुगू सिनेमात ग्रँड डेब्यू; #RAPO23 च्या सेटवर जंगी स्वागत

Riteish Deshmukh : बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडणारा रितेश देशमुख आता तेलुगू सिनेमातही एन्ट्री करायला सज्ज झाला आहे.

Riteish Deshmukh

Riteish Deshmukh

Riteish Deshmukh : बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडणारा रितेश देशमुख आता तेलुगू सिनेमातही एन्ट्री करायला सज्ज झाला आहे. एनर्जेटिक स्टार राम पोथिनेनीच्या #RAPO23 या चित्रपटातून रितेश तेलुगू इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. चित्रपटाच्या मेकर्सनी त्याच्या एन्ट्रीची अधिकृत घोषणा केली असून, सध्या हैदराबादमध्ये सुरू असलेल्या शूटिंगमध्ये रितेशही टीमसोबत सहभागी झाला आहे. सेटवरचे बिहाइंड द सीन्स (BTS) व्हिडिओ समोर आले असून, त्यात राम पोथिनेनी रितेशचं अगदी आपुलकीने स्वागत करत त्याला मिठी मारताना दिसतोय. दोघांची ही खास भेट सध्या चर्चेचा विषय ठरतेय!

विशेष म्हणजे, #RAPO23 मध्ये राम पोथिनेनी केवळ अभिनयाची धुरा सांभाळत नाहीये, तर दिग्दर्शक म्हणूनही आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करतोय. कृष्णा पोथिनेनी यांच्या रापो सिनेमॅटिक्स या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली तयार होणारा हा चित्रपट भव्य स्तरावर बनवला जात आहे. चित्रपटाची कथा निओ-नॉयर विश्वात घडते, त्यामुळे रहस्य, थरार आणि सस्पेन्सचा एक वेगळाच तडका प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

‘एक व्हिलन’, ‘रेड 2’ आणि ‘राजा शिवाजी’ यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची ताकद दाखवणारा रितेश देशमुख आता साऊथ सिनेमातही आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट आणि आपली व्यक्तिरेखा आवडल्यामुळे रितेशने या प्रोजेक्टला होकार दिल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे, कथेत त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे रितेशची ही नवी इनिंग नेमकी कशी रंगणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

मेकर्सनी शेअर केलेल्या BTS व्हिडिओमध्ये रितेशचा चेहरा अद्याप स्पष्टपणे दिसत नसला, तरी सेटवर त्याची झालेली एन्ट्री आणि राम पोथिनेनीसोबतची त्याची खास भेट पाहायला मिळतेय. रामने रितेशचं केलेलं हे जंगी स्वागत पाहून चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कशी रंगणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या चित्रपटात संयुक्ता मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार असून, इतर अनेक कलाकारही महत्त्वाच्या व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

संजय राऊत साईज बघून बोला, चार बोटे तुमच्याकडे आहेत हे विसरू नका, नवनाथ बन भडकले

चित्रपटाच्या टेक्निकल टीममध्ये सिनेमॅटोग्राफर थिरुनावुकरासु (तिर्रू), प्रॉडक्शन डिझायनर ए. एस. प्रकाश आणि संगीतकार सॅम सी. एस. यांचा समावेश आहे. तर अ‍ॅक्शन सीक्वेन्सची जबाबदारी पीटर हेन, विक्रम मोर आणि केविन सांभाळत आहेत. म्हणजेच, पडद्यावर अ‍ॅक्शनचा धमाका होण्याचीही पूर्ण तयारी आहे. सध्या हैदराबादमध्ये #RAPO23 चं शूटिंग जोरात सुरू आहे. एका बाजूला राम पोथिनेनी दिग्दर्शक म्हणून नवी इनिंग सुरू करतोय, तर दुसऱ्या बाजूला रितेश देशमुख तेलुगू सिनेमात पदार्पण करतोय. आता या दोन गोष्टींचा भन्नाट मेळ पडद्यावर काय कमाल करणार, हे पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे. त्यामुळे #RAPO23 बद्दलची चाहत्यांची एक्साइटमेंट वाढणार.

Exit mobile version