Download App

Don 3: डॉन-3 येणार चाहत्यांच्या भेटीला; सिनेमाच्या निर्मात्यांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले…

Don 3: बॉलिवूडमधील बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच किंग खानचा डॉन (Don) या सिनेमाचे दोन भाग रिलीज झाले आहेत. यामधील डॉन (Don: The Chase Begins Again) हा सिनेमा 2006 मध्ये रिलीज झाला तर डॉन- द किंग इज बॅक (Don 2: The King Is Back) हा सिनेमा 2011 मध्ये चाहत्यांच्या भेटीला आला होता.

या दोन्ही सिनेमामध्ये किंग खानने मुख्य भूमिका साकारली आहे. आता डॉन या सिनेमाच्या तिसर्‍या (Don 3) भागाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. आता ‘डॉन 3’ या सिनेमाबाबत निर्माते रितेश सिधवानी (Ritesh Sidhwani) यांनी मोठी अपडेट समोर आली आहे. दिग्दर्शक-अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम करत असल्याची माहिती निर्माते रितेश सिधवानी यांनी दिली आहे.

नेमकं काय म्हणाले रितेश सिधवानी?
एका मुलाखतीच्या दरम्यान रितेश सिधवानी यांनी सांगितले आहे की, ‘जोपर्यंत माझा पार्टनर (फरहान अख्तर) सिनेमाची स्क्रिप्ट लिहिण्याचे काम पूर्ण करत नाही, तोपर्यंत आम्ही काही करणार नाही. सध्या तो स्क्रिप्ट पूर्ण करण्यामध्ये व्यस्त आहे. आम्ही सर्वजण डॉनला बघण्याची आतुरतेने वाट बघत आहोत.

फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी या दोघांचे एक्सेल एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊस आहे. या दोन्ही निर्मात्यांनी मिळून 1978 साली प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या डॉन या चित्रपटाचे राइट्स विकत घेतले. यानंतर 2006 साली डॉन चित्रपटाचा पहिला रिमेक प्रदर्शित झाला, ज्यामध्ये शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) मुख्य भूमिकेत होते. हा सिनेमात सुपरहिट ठरला होता. ५ वर्षांनंतर 2011 मध्ये डॉन 2 रिलीज झाला, जो लोकांना मोठ्या प्रमाणात आवडला आहे. हे दोन्ही सिनेमा फरहान अख्तरने दिग्दर्शित केले होते.

‘धकधक गर्ल’चा आज वाढदिवस, माधुरी दीक्षितचे सुरूवातीचे अनेक चित्रपट फ्लॉप, आज करोडोंच्या संपत्तीची मालकीण

किंग खान हा लवकरच जवान (Jawan) आणि डंकी (Dunki) या सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या आगामी सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही महिन्याअगोदर किंग खानाला ‘पठाण’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठा धुमाकूळ घातला होता. जगभरात या सिनेमाने जवळपास 1050 कोटींची कमाई केली होती. आता डॉन-3 मध्ये देखील किंग खान हा मुख्य भूमिकासाकारताना दिसून येण्याची शक्यता आहे.

Tags

follow us