Download App

Rockstar डीएसपीने दुबईतील ए.आर. रहमानच्या फिरदौस स्टुडिओला दिली खास भेट

Rockstar DSP in Dubai : रॉकस्टार डीएसपीने (Rockstar DSP ) नुकतीच प्रसिद्ध संगीतकार ए.आर. यांनी तयार केलेल्या जगप्रसिद्ध फिरदौस स्टुडिओला (Firdaus Studio) भेट दिली आणि हा खास (Social media) अनुभव त्यांचा इंस्टाग्रामवर (Instagram) शेयर केला आहे.


रॉकस्टार डीएसपीची फिरदौस स्टुडिओला भेट खरोखरच उल्लेखनीय ठरली. हा स्टुडिओ (Social media) जगातील पहिल्या सर्व-महिला सिम्फनी ऑर्केस्ट्राचे घर असणार आहे. संगीतकार आणि संगीत प्रेमींसाठी एक आश्रयस्थान, फिरदौस अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दुर्मिळ वाद्य साधनांचा संग्रह आहे. जे कलाकारांसाठी कायम प्रेरणास्थान ठरणार आहे. रॉकस्टार डीएसपीने या स्टुडिओची खास टूर शेयर करून त्याचा आनंद व्यक्त केला आहे.

दरम्यान व्यावसायिक कारकिर्दीत रॉकस्टार डीएसपीची एक नवीन प्रोजेक्ट येणार असून “पुष्पा 2: द रुल’, ‘कंगुवा’ आणि प्रतिभावान दिग्दर्शक विकासबहल दिग्दर्शित अजय देवगण आणि आर. माधवन अभिनीत अद्याप शीर्षक नसलेला सिनेमा यांचा समावेश असणार आहे. या प्रकल्पांसाठी आतुरतेने अपेक्षित रिलीजची तारीख 8 मार्च 2024 ही सेट करण्यात आली आहे. चाहते DSP च्या आगामी संगीत उपक्रमांची आतुरतेने वाट बघत असल्याचे दिसत आहे.

Aparshakti Khurana: अपारशक्ती खुराणा दिसणार ऑटो- रिक्षा चालकाच्या भूमिकेत

संगीतकार देवी श्री प्रसाद यांनी नुकताचं पुष्पा: द रायझिंग या तेलगू चित्रपटातील त्यांच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट संगीताचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केला. डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. समीक्षक आणि प्रेक्षकांनीही चित्रपटाच्या संगीताचे भरभरून कौतुक केले.अजय देवगण, आर. माधवन आणि ज्योतिका या त्रिकूटाने अभिनीत तो नवा प्रोजेक्ट करणार आहे. विशेषतः रॉकस्टार डीएसपी आणि अजय देवगण यांनी ‘दृश्यम 2’ मध्ये एकत्र काम केल्यानंतर आता नवीन काय असणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे.

Tags

follow us