Download App

आगामी चित्रपटासाठी Rohit Saraf सज्ज; सनी संस्कार की तुलसी कुमारीचं शूटींग सुरू…

Rohit Saraf हा कायम वैविध्यपूर्ण भूमिका मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. नुकतच त्याच्या 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' च्या शूट सुरु झालं.

Rohit Saraf Film Sunny Sanskar ki Tulsi Kumari Shooting start : अभिनेता रोहित सराफ (Rohit Saraf) हा कायम वैविध्यपूर्ण भूमिका मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याच्या नुकत्याच आलेल्या ‘इश्क विश्क रिबाऊंड’ या चित्रपटा ने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली. अलीकडेच मुंबईत त्याने त्याच्या ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ (Sunny Sanskar ki Tulsi Kumari) च्या शूटला सुरुवात केली. अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावर क्लिपबोर्डचा एक फोटो शेअर केला आणि त्याचे सह कलाकार सान्या मल्होत्रा, वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांना टॅग केले.

‘Mirzapur 3’ मधील ‘झरीना’ नेमकी आहे तरी कोण? निरागस हास्यने चाहत्यांच्या मनाला भुरळ घालते

तत्पूर्वी धर्मा प्रॉडक्शनच्या चित्रपटाच्या मुहूर्त पूजेची झलक त्याने सोशल मीडिया वर शेअर केली होती. उत्साह व्यक्त करताना त्यांनी लिहिले होते ” याची वाट पाहू शकत नाही” रोहित सराफच्या भूमिकेचे तपशील अद्याप गुलस्त्यातच असून शशांक खेतान दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता काय भूमिका साकारणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

निराशाजनक अन् विनाशकारी…; मोदी पुतिन भेटीनंतर खास मित्र नाराज; व्यक्त केल्या तीव्र भावना

‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ च्या पलीकडे रोहित सराफ ‘मिसमॅच 3’ मध्ये ऋषी सिंग शेखावतच्या त्याच्या लाडक्या भूमिकेची पुनरावृत्ती करताना दिसणार आहे. याशिवाय तो मणिरत्नमच्या ‘ठग लाइफ’साठीही तयारी करत आहे, ज्यामध्ये तो दिग्गज कमल हासनसोबत पहिल्यांदाच स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसेल.

follow us