Download App

Navra Maza Navsacha 2: ‘नवरा माझा नवसाचा 2’ चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच

Navra Maza Navsacha 2 Teaser launch: 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाविषयी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • Written By: Last Updated:

Navra Maza Navsacha 2 Teaser launch: ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाविषयी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. (Marathi Movie) या चित्रपटात अभिनेत्री हेमल इंगळे तर अभिनेता स्वप्नील जोशी ही जोडी (Sachin Pilgaonkar) सचिन-सुप्रिया यांच्या मुलगी-जावई अशा भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर (Navra Maza Navsacha 2 Teaser) सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे.

नवरा माझा नवसाचा 2 । OFFICIAL TEASER । NAVRA MAAZA NAVSAACHA 2  । 20th Sept. 2024

‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाची निर्मिती

सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेने केली आहे. चित्रपटाची कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येणार आहे.

Bharat Jadhav Exclusive | स्वातंत्र्यदिनी भरत जाधव यांचा ट्रिपल धमाका !  LetsUpp Marathi

‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांना आवडतो. त्यामुळे आता ‘नवरा माझा नवसाचा 2’ मध्ये काय धमाल अनुभवायला मिळणार याची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. या टीजर मधून चित्रपटाच्या कथानकाविषयी थोडासा अंदाज बांधण्यात येत असून 80 कोटीचे हिरे आता 800 कोटीचे झाले आहेत. त्यामुळे हा मनोरंजक प्रवास अनुभवण्यासाठी आता प्रेक्षकांना केवळ 20 सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Navra Maza Navsacha 2 : ‘नवरा माझा नवसाचा 2’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च

19 वर्षांनी सिनेमाचा सिक्वेल

सचिन पिळगावकर दिग्दर्शित “नवरा माझा नवसाचा” या गाजलेल्या चित्रपटानंतर तब्बल 19 वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेल येणार आहे. येत्या 20 सप्टेंबर रोजी या सिनेमा सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे. एस टी बस प्रवासात “नवरा माझा नवसाचा” चित्रपटाची गोष्ट घडवल्यानंतर आता “नवरा माझा नवसाचा 2” चित्रपटाची कथा कोकण रेल्वे प्रवासात घडणार आहे.

follow us