Download App

800 Trailer: मुथय्या मुरलीधरनच्या बायोपिकचा टीझर झाला लॉन्च; ५ सप्टेंबरला सचिन करणार ट्रेलर प्रदर्शित

Sri Lankan cricketer Muttiah Muralitharan: श्रीलंकेचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरनच्या जीवनावर आधारित बायोपिक सिनेमा ‘८००’चा ट्रेलर ५ सप्टेंबर दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे. (Muttiah Muralitharan) या सिनेमाचा टीझर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. तर ट्रेलर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) मुंबईमध्ये लॉन्च करणार आहे. या सिनेमात मुरलीधरनची मुख्य भूमिका अभिनेता मधुर मित्तल करणार आहे. ज्याने स्लमडॉग मिलेनियर या ऑस्कर विजेत्या सिनेमात काम केले होते.

मुथय्या मुरलीधरनचा हा सिनेमा ‘८००’ हा एमएस श्रीपाथी यांनी लिहिला आहे, आणि दिग्दर्शिनाची धुरा सांभाळला आहे. हा सिनेमा ३ भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलुगूचा देखील समावेश आहे. ट्रेलर लॉन्चच्या निमित्ताने मुरलीधरनच्या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेची माहिती देखील देण्यात येणार आहे. प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या टीझरमध्ये मुरलीधरनच्या आयुष्याशी संबंधित काही महत्त्वाच्या रंजक अशा घटना दाखवण्यात आल्या आहेत.


या सिनेमासाठी सुरुवातीला प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपती मुरलीधरनची भूमिका साकारणार होता. परंतु नंतर विरोध झाल्याने त्यांनी आपले नाव मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुरलीधरनने आपल्या कारकिर्दीमध्ये १३ वेळा सचिन तेंडुलकरला आपला आऊट केले होते. तर मुरलीधरनने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना भारताविरुद्ध खेळला होता.

Journey Release Date: असामान्य संघर्षाची ‘जर्नी’ लवकरच उलगडणार, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

तसेच मुथय्या मुरलीधरनने २००५ मध्ये चेन्नई येथील रहिवासी मधिमलर राममूर्तीशी लग्न केले होते. १९९२ मध्ये मुथय्या मुरलीधरनने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एन्ट्री केला होता. यानंतर मुरलीधरनने १३३ कसोटी सामन्यामध्ये २२.७३ च्या सरासरीने ८०० बळी घेतल्याचे दाखवण्यात आले. तो हा कारनामा करणारा देशातील पहिला गोलंदाज आहे. या कालावधीमध्येच मुरलीधरनने ६७ वेळा एका डावात ५ आणि २२ वेळा डावात १० विकेट्स घेण्याचा अनोखा पराक्रम केला होता. तसेच ३५० वनडे खेळत असताना मुरलीधरनने ५३४ विकेट्स घेतले आहेत.

Tags

follow us