फ्रेश जोडी, फ्रेश रोमॅन्स! ‘एक दिन’च्या टीझरमध्ये साई पल्लवी आणि जुनैद खानने जिंकली प्रेक्षकांची मने

रोमँटिक ड्रामा फिल्म ‘एक दिन’ मधील साई पल्लवी आणि जुनैद खान यांच्या क्युट, फ्रेश आणि मनमोहक जोडीने पहिल्याच झलकमध्ये प्रेक्षकांची मने जिंकली.

Untitled Design   2026 01 17T114615.471

Untitled Design 2026 01 17T114615.471

Sai Pallavi and Junaid Khan won the hearts : आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी रोमँटिक ड्रामा फिल्म ‘एक दिन’ अखेर तिच्या टीझरसह प्रेक्षकांच्या भेटीला आली असून, साई पल्लवी आणि जुनैद खान यांची क्युट, फ्रेश आणि मनमोहक जोडी पहिल्याच झलकमध्ये मन जिंकून घेते. या चित्रपटातून प्रेक्षकांना एक सॉफ्ट, क्लासिक आणि भावनिक प्रेमकथा पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट होते.

हिवाळ्यातील बर्फाच्छादित सुंदर दृश्यांपासून सुरू होणारा ‘एक दिन’चा टीझर हृदयाला स्पर्श करणाऱ्या संवादांसह पुढे सरकतो. पार्श्वसंगीतातील गोड, सुकून देणारी धून प्रेमाच्या भावना अधिक गहिऱ्या करते. साई पल्लवी आणि जुनैद खान यांच्यातील नैसर्गिक केमिस्ट्री टीझरमधूनच जाणवते आणि आजच्या काळात क्वचितच दिसणाऱ्या अशा रोमँटिक लव्ह स्टोरीचे वचन देते, जी मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा प्रेमाची जादू अनुभवायला देईल.

साऊथ सिनेमाची ‘क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी साई पल्लवी या चित्रपटातून तिचा बहुप्रतिक्षित हिंदी डेब्यू करत आहे. तिचा सिग्नेचर ग्रेस, साधेपणा आणि अभिनयातील खोली टीझरमध्येच लक्ष वेधून घेतात. तर दुसरीकडे जुनैद खान एका नव्या, इमोशनल झोनमध्ये पूर्ण आत्मविश्वासाने दिसतो. त्याच्या अभिनयातील निरागसता आणि चार्म या प्रेमकथेला अधिक रिअल आणि खास बनवतात. ही ऑन-स्क्रीन जोडी पहिल्याच झलकमध्ये ताजी आणि जादुई वाटते.

पुण्यात पती-पत्नी, सख्ख्या भावांसह सासू-सुना देखील महापालिका सभागृहात दिसणार एकत्र

‘एक दिन’च्या निमित्ताने आमिर खान आणि मंसूर खान यांचे दीर्घकाळानंतर पुन्हा एकत्र येणे हे या चित्रपटाचे आणखी एक मोठे आकर्षण आहे. यापूर्वी या जोडीने कयामत से कयामत तक, जो जीता वही सिकंदर, अकेले हम अकेले तुम आणि जाने तू… या जाने ना यांसारख्या अजरामर रोमँटिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यामुळे ‘एक दिन’कडूनही तितकीच खास आणि लक्षात राहणारी प्रेमकथा मिळेल, अशी अपेक्षा प्रेक्षकांना आहे.

आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘एक दिन’ चित्रपटात साई पल्लवी आणि जुनैद खान प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुनील पांडे यांनी केले असून, आमिर खान, मंसूर खान आणि अपर्णा पुरोहित यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. हा चित्रपट 1 मे 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. रोमान्स आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘एक दिन’ नक्कीच एक खास सिनेमॅटिक अनुभव ठरणार, यात शंका नाही.

Exit mobile version