साई पल्लवीचा नवा अवतार, खाकीचा जबरदस्त दरारा! ​‘ओम: चैप्टर 1’ मध्ये आईपीएस नित्या रेड्डीची झलक

Sai Pallavi :  ओम: चैप्टर 1 च्या निर्मात्यांनी नुकताच साई पल्लवीचा नवा टीझर प्रदर्शित केला असून, यात ती आईपीएस अधिकारी नित्या रेड्डीच्या

Sai Pallavi

Sai Pallavi

Sai Pallavi :  ओम: चैप्टर 1 च्या निर्मात्यांनी नुकताच साई पल्लवीचा नवा टीझर प्रदर्शित केला असून, यात ती आईपीएस अधिकारी नित्या रेड्डीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. आपल्या अभिनयाने आणि सहजसुंदर स्क्रीन प्रेझेन्सने प्रेक्षकांची मनं जिंकणारी साई यावेळी एका दमदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. धनुष आणि ममूटी यांसारख्या दिग्गज कलाकारांची मांदियाळी असलेल्या या बहुप्रतीक्षित चित्रपटात साईचा हा नवा अवतार उत्सुकता आणखी वाढवणारा आहे.

आपल्या प्रत्येक भूमिकेत वेगळेपण जपणारी साई पल्लवी यावेळी खाकी वर्दीत दिसणार असल्याने तिच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच आहे. नव्या टीझरमधून नित्या रेड्डी या व्यक्तिरेखेची झलक पाहायला मिळते. तिचा स्वभाव, तिची देहबोली आणि पडद्यावरील तिची उपस्थिती यामुळे ही व्यक्तिरेखा नेमकी कोणतं वादळ घेऊन येणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, चित्रपटाच्या मोठ्या कथानकात तिची भूमिका काय असेल, याबाबत निर्मात्यांनी सध्या गुपित कायम ठेवलं आहे.

साई पल्लवीच्या कारकिर्दीतही ही भूमिका एक वेगळी भर घालणारी ठरण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अनेक लक्षवेधी भूमिका साकारल्यानंतर आता ती एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील काही दिग्गज कलाकार एकत्र आलेल्या या चित्रपटात साईचा हा नवा अवतार प्रेक्षकांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचवणारा आहे.

चित्रपटातील साई पल्लवीच्या सहभागाबद्दल बोलताना आरटेक स्टूडियोज़ च्या निर्मात्या श्रद्धा अग्रवाल म्हणाल्या, “साई पल्लवी एक अप्रतिम अभिनेत्री आहे आणि तिच्या प्रत्येक भूमिकेतून दिसणारा प्रामाणिकपणा आम्हाला नेहमीच भावला आहे. नित्या रेड्डी ही चित्रपटातील एक महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे आणि ही भूमिका साकारण्यासाठी साईपेक्षा उत्तम अभिनेत्री आम्हाला मिळूच शकली नसती. साई आमच्या चित्रपटाचा भाग आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहे. प्रेक्षक तिला या भूमिकेत पाहतील, याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.”

राजकुमार पेरियासामी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या ओम: चैप्टर 1 मध्ये साई पल्लवीसोबत धनुष, ममूटी, श्रीलीला आणि नसीरुद्दीन शाह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. आरटेक स्टूडियोज़ आणि वंडरबार फिल्म्स यांची निर्मिती असलेला हा चित्रपट भव्य स्तरावर साकारण्यात येत असलेला अ‍ॅक्शन थ्रिलर आहे.

कातिल नहीं.. आशिक हूं…’, शाहरुख खानने ‘किंग’चा नवा दमदार पोस्टर केला प्रदर्शित

साई पल्लवीच्या व्यक्तिरेखेची झलक समोर आल्यानंतर ओम: चैप्टर 1 च्या दुनियेबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता 20 नोव्हेंबर 2026 रोजी हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांत दाखल होणार असून, पडद्यावर नित्या रेड्डीचा नेमका काय जलवा पाहायला मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे!

Exit mobile version