Download App

Saif Ali Khan : लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल!

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ल्याची घटना घडल्यानंतर त्याच्या घरी काम करणाऱ्या लिमा यांच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलायं.

Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) आज राहत्या घरी जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडलीयं. या घटनेमध्ये सैफ जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सैफच्या घरी काम करणाऱ्या एरियामा फिलिप्स उर्फ लिमा यांनी वांद्रे पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलायं. यासोबतच टरेस पासिंग, चोरीचाही गु्न्हा दाखल करण्यात आलायं.

हॅपी ‘फिनलंड’मध्ये वाढतोय उदासपणा.. संयुक्त राष्ट्रांचा हॅपीनेस रिपोर्ट किती खरा?

अभिनेता सैल अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्यानंतर त्याच्याव मुंबईतील लिलावती रूग्णालयात तातडीचे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी सैळ अली खानच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती देत सैफच्या मणक्यातून सुऱ्याचं अडीच इंची पातं बाहेर काढण्यात आल्याचे सांगितले. तसेच त्याच्या थोरॅसिक स्पायनल कॉडलादेखील दुखापत झाली असून, सध्या त्याला अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यासंदर्भत लिलावती रुग्णालयातील डॉ. निरज उत्तमानी आणि न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिलीयं.

सहा वार अन् पाठीला दुखापत, सैफवर होणार प्लास्टिक सर्जरी; हेल्थ बुलेटिन जारी

मध्यरात्री झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ अली खानला मुंबईतील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टारांकडून सर्जरी करण्यात आली आहे. याबाबत बोलताना न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांनी सांगितले की, सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्याच्या मणक्यातून सुऱ्याचं अडीच इंची पातं बाहेर काढण्यात आलं आहे. सैफच्या थोरॅसिक स्पायनल कॉडलादेखील मोठी दुखापत झाली असून, स्पायनल फ्लुईडचा प्रवाह थांबवण्यात आलायं. दरम्यान, सर्जरीनंतर सैफ अली खानची प्रकृती स्थिर असून, त्याला एक दिवसासाठी अतिदक्षता विभागात निगराणीसाठी ठेवण्यात आले असून, त्याची तब्येतीची 100 टक्के रिकव्हरी होईल असा विश्वासह डॉक्टरांनी व्यक्त केलायं.

follow us