Saif Ali Khan meets soldiers at the Kaman Aman Setu in Uri : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अभिनेता सैफ अली खान याच्या जम्मू-काश्मीरमधील उरी येथील कामन अमन सेतू भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सैफच्या अधिकृत फॅन अकाउंटवर हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
लाल किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमाला राहुल गांधी अनुपस्थित, कारण काय? पवन खेडा स्पष्टच बोलले …
या फोटोंमध्ये सैफ अमन सेतूच्या ऐतिहासिक ठिकाणी उभा राहून तेथे तैनात असलेल्या जवानांशी संवाद साधताना दिसत आहे. यावेळी त्याने या ठिकाणाचे ऐतिहासिक महत्त्वही जाणून घेतले.
दरम्यान, कामाच्या आघाडीवर सैफ अली खान लवकरच ‘हैवान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये सैफ एका दृष्टिहीन व्यक्तीची भूमिका साकारत असल्याचे समोर आले आहे. त्याच्या कारकिर्दीतील ही भूमिका पहिल्यांदाच अशा स्वरूपाची असणार आहे.
‘हैवान’च्या निमित्ताने सैफ पहिल्यांदाच दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यासोबत काम करत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार याचीही प्रमुख भूमिका आहे. ‘हैवान’ हा चित्रपट 11 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
