Download App

क्राईम अन् सस्पेन्सने भरलेला ‘SAJINI Shinde Ka Viral Video’ चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

SAJINI Shinde Ka Viral Video: क्राईम, थ्रिलर आणि सस्पेन्सने परिपूर्ण असलेल्या ‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’ (SAJINI Shinde Ka Viral Video) या सिनेमाची सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार चर्चा रंगत आहे. (Movie) नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित (Trailer Out ) करण्यात आला आहे. या ट्रेलरने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवातच सजनी शिंदेच्या मृत्यूला जबाबदार कोण? या प्रश्नाने होत असल्याचे बघायला मिळत आहे. यामध्ये सजनी शिंदे ही एक शिक्षिका अचानक गायब होते. तिचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आणि त्या व्हिडीओवर लाखो लाइक्स कमेंट्स येत असतात. परंतु शिक्षिका असेलल्या सजनीचा हा असा व्हिडीओ बघून तिच्यावर जोरदार टीका होते. ही टीका सहन न झाल्यानं सजनी टोकाचं पाऊल उचलते की आणखी काय? ती नेमकी कशी गायब होते? ती जिवंत आहे की नाही, या भोवती संपूर्ण सिनेमाचे कथानक फिरत असल्याचे बघायला मिळत आहे.

या सिनेमाच्या सस्पेन्स ट्रेलरने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सिनेमात अनेक मराठी कलाकार देखील बघायला मिळत आहेत. यामध्ये सजनी शिंदे हे पात्र राधिका मदनने साकारली आहे. तर निम्रत कौर ही या सिनेमात पोलीस अधिकारी असल्याचे बघायला मिळत आहे. सोबतच यात भाग्यश्री, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, शशांक शिंदे आणि सुमीत व्यास यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत.

Sam Bahadur: अखेर प्रतीक्षा संपली! विकी कौशलचा बहुचर्चित ‘सॅम बहादुर’ हा सिनेमा ‘या’ दिवशी येणार भेटीला

या सिनेमाची निर्मिती दिनेश विजान यांनी केली आहे. याअगोदर त्यांनी स्त्री, भेडिया आणि बदलापूर यांसारखे अनेक सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन मिखिल मुसळे यांनी केले आहे. तर मिखिल मुसळे आणि परिंदा जोशी यांनी सिनेमाची कथा आणि पटकथा लिहिली आहे. तसेच अतिरिक्त पटकथा आणि संवाद अनु सिंग चौधरी आणि क्षितिज यांनी दिले आहे. ‘सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ हा सिनेमा २७ ऑक्टोबर २०२३ दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Tags

follow us