Download App

Salaar Trailer: अखेर प्रतीक्षा संपली! प्रभासच्या ‘सालार’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर ‘या’ दिवशी येणार भेटीला

Salaar Trailer Date Announced: प्रभास (Prabhas) स्टारर चित्रपट ‘सालार पार्ट 1: सीझफायर’ (Salaar Trailer) हा 2023 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर आता ‘सालार पार्ट 1: (Salaar Movie) सीझफायर’ची प्रतीक्षा संपली आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येण्यासाठी काही तासच शिल्लक आहेत. जुलैमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांना खूप प्रभावित केले होते आणि आता चाहत्यांची चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल देखील उत्सुकता वाढत आहे.


प्रभासचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सालार पार्ट 1: सीझफायर’चा ट्रेलर रिलीज होण्यास फक्त एक दिवस बाकी आहे. चित्रपटाचा ट्रेलर 1 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7:19 वाजता प्रदर्शित होणार आहे. प्रभासने सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करून ट्रेलर रिलीजची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. सध्या चाहत्यांना ‘सालार पार्ट 1’ च्या ट्रेलरची प्रचंड उत्सुकता लागल्याची बघायला मिळत आहे.

‘सालार पार्ट 1’ ने रिलीज होण्यापूर्वीच खूप लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटाचे ओटीटी हक्क विकले गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे ओटीटी अधिकार 160 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. केजीएफचे दिग्दर्शक प्रशांत नील आणि प्रभास यांनी ‘सालार पार्ट 1’ मध्ये पहिल्यांदा एकत्र काम केले आहे.

15th International Kudo Tournament: खिलाडी अक्षय कुमारसह आंतरराष्ट्रीय कुडो स्पर्धत दिसली दिशा पटानी

हॉम्बल फिल्म्स निर्मित या चित्रपटात प्रभास व्यतिरिक्त श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू यांनी महत्त्वाच्या भूमिकेत बघायला मिळत आहेत. हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ हा चित्रपटही चित्रपटगृहात दाखल होणार आहे. यामुळे या दोन सुपरस्टार्समध्ये चुरशीची स्पर्धा पाहणे रंजक ठरणार आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज