Download App

Tiger 3 Song Out: भाईजानच्या ‘टायगर-3’ चित्रपटातील धमाकेदार गाण्याची पहिली झलक

Tiger 3 Song Out: बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खान (Salman Khan) हा आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये बघायला मिळत आहे. भाईजानचा ‘टायगर-3’ (Tiger 3 Trailer) या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात झाला. या ट्रेलरमध्ये भाईजान आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) हे चांगलच अॅक्शन मोडमध्ये बघायला मिळत आहेत. तसेच या ट्रेलरमधील इमरान हाश्मीच्या (Emraan Hashmi) लूकनं देखील चाहत्यांचा लक्ष वेधले आहे. आता सिनेमातील ‘लेके प्रभू का नाम’ पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.


कतरिना कैफ आणि सलमान खान यांच्या “टायगर 3” या चित्रपटातील गाण्याची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली असून आता सगळ्यांना चित्रपटाचे वेध लागले आहेत. कैटरीनाने तिच्या सोशल मीडियावर आगामी ‘लेके प्रभू का नाम’ या गाण्याच पोस्टर शेयर केलं आणि या पोस्टला कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आमच्या पहिल्या गाण्याची पहिली झलक, या दिवाळीत चित्रपटगृहांमध्ये #Tiger3, 12 नोव्हेंबर २०२३ ला येणार आहे.

‘टायगर- 3’ या सिनेमाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला भाईजान म्हणजेच टायगरचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे. यानंतर भाईजान आणि कतरिना कैफ हे अॅक्शन मोडमध्ये दिसतात. ‘जब तक टाइगर मरा नहीं, तब तक टाइगर हारा नहीं…’ हा भाईजानचा डायलॉग ‘टायगर- 3’ या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये ऐकायला मिळत आहे. टायगर-3 या सिनेमाचा ट्रेलर बघितल्यानंतर असा अंदाज लावला जात आहे की, या सिनेमात टायगर हा देशासाठी आणि कुटुंबासाठी आपले प्राण प्रणाला लावणार आहे. या सिनेमात इमरान हाश्मी हा खलनायकाची भूमिकेत बघायला मिळणार आहे.

Singham Again: सिंघममध्ये टायगर श्रॉफची एन्ट्री; स्पेशल टास्क फोर्स ऑफिसर एसीपी सत्याच्या भूमिकेत दिसणार

भाईजान या ट्रेलरमध्ये काही स्टंट करत असल्याचे देखील बघायला मिळत आहे. तसेच कतरिनाचे देखील काही अॅक्शन सीन्स ‘टायगर- 3’ या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. ‘टायगर 3 या सिनेमाचा हा २ मिनिटे ५१ सेकंदाचा ट्रेलर पाहिल्यानंतर यंदा ‘भाईजान हा दिवाळीला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका करणार’, असा अंदाज चाहते लावत आहेत.

या सिनेमात भाईजान सोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. तर ‘टायगर 3’ हा सिनेमा यंदा दिवाळीमध्ये 12 नोव्हेंबर दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us