Download App

Salman Khan: ‘या तारखेला तुला मारणार’; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

  • Written By: Last Updated:

Salman Khan Death Threats : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान ला (Salman Khan ) ठार मारण्याच्या धमक्या गेल्या काही दिवसांपासून सतत येत आहेत. अशातच सलमान खानच्या सुरक्षेमध्ये आता मोठी वाढ  करण्यात आली आहे. लॉरेन्स बिष्णोई गॅंगच्या निशाण्यावर असलेल्या या अभिनेत्याला आता 30 एप्रिलला ठार मारले जाणार असल्याची धमकीचा कॉल काल मुंबई पोलिस (Mumbai Police) कंट्रोल रूम मध्ये आला.

Pritam Munde | एका शेतकऱ्याला मुंडेंनी कसं सावरलं पाहा...| LetsUpp Marathi

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कॉल राजस्थानच्या जोधपूर मधून Roki Bhai नामक व्यक्तीने केला आहे. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

सलमानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार

सलमानला यापूर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. म्हणूनच खबरदारीसाठी त्याने नुकतंच स्वतःसाठी एक संरक्षण कवच अर्थात बुलेट प्रूफ कारची खरेदी केली आहे. जेणेकरून घराबाहेर पडल्यानंतर काही घटना घडलीच तर या कारद्वारे सलमान स्वतःचा बचाव करू शकेल.

Akshay Kumar : 55 वर्षीय खिलाडीला शर्टलेस होऊन डान्स करणं पडलं महागात; व्हिडीओ पाहून चाहते भडकले

सलमानने निसान पेट्रोल एसयूव्ही कार स्वतःच्या ताफ्यात समाविष्ट केली आहे. सध्या ही कार भारतीय बाजारपेठेत लाँचदेखील झाली नाहीये. पण वारंवार येणाऱ्या धमक्यांनंतर सलमानने ही कार खरेदी केली आहे.

Tags

follow us