Download App

Jawan: किंग खानचा जलवा पाहून भाईजान झाला खूश! ‘जवान’ प्रीव्यू शेअर करत म्हणाला…

Salman Khan On King Khan Jawan: बॉलिवूडचा (Bollywood) शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच किंग खानचा ‘जवान’ (Jawan) सिनेमाच्या माध्यमातून परत एकदा रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच ‘जवान’चा प्रीव्यू चाहत्यांच्या भेटीला आला आहे. आता चाहत्यांना देखील या सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढत असल्याचे दिसून येत आहे. ‘जवान’च्या (Jawan) प्रीव्यूचं सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात कौतुक होत असताना दिसून येत आहे.


भाईजान म्हणजेच सलमान खान (Salman Khan) देखील यामध्ये आता मागे पडला नसल्याचे दिसत आहे. किंग खानच्या ‘जवान’चा प्रीव्यू व्हिडीओ भाईजानने शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर (Video share) करत भाईजानने लिहिले आहे की, पठाण’ आता ‘जवान’ झाला आहे. उत्कृष्ट ट्रेलर.. लय भारी झालाय, आपल्याला आवडला… हा सिनेमा चित्रपटगृहात बघण्यासाठी खरच मजा येणार असल्याचे यावेळी त्याने सांगितले आहे. मी तर रिलीजच्या पहिल्याच दिवशी बघणार आहे.. मजा आली वाह…”. भाईजानने शेअर केलेल्या या व्हिडीओवर भाईजान आणि किंग खान बॉलिवूडचे सुपरस्टार, भाई आता आपल्याला तुझा सिनेमा बघायचा आहे, दोंनो खान सभी की जान, अशा कमेंट्स चाहत्यांनी करण्यास सुरुवात केली आहे.

भाईजानच्या आणि किंग खान हे दोघेही १९९० च्या दरम्यान सिनेमा इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली आहे. दोघांची खूपच चांगली मैत्री असल्याचे सांगण्यात येत असते. १९९५ साली ‘करण अर्जुन’ या धमाकेदार सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं होतं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर देखील सुपरहिट ठरला होता. किंग खानच्या ‘पठाण’ या सिनेमात भाईजानची एक झलक बघायला मिळाली आहे. दोघांची कायम फाईट सीन चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरत असते.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

आता भाईजानच्या ‘टायगर 3’ (Tiger 3) या सिनेमात किंग खानची देखील झलक बघायला मिळणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या सिनेमात कतरिना कैफ देखील धमाकेदार एन्ट्री करणार आहे. हा सिनेमा १० नोव्हेंबर २०२३ दिवशी हा सिनेमा चाहत्यांच्या  भेटीला येणार आहे. किंग खानचा ‘जवान’ हा सिनेमा ७ सप्टेंबर २०२३ दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमामध्ये किंग खानसोबत दीपिका पादुकोण, नयनतारा, विजय सेतुपती हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये झळकणार आहे. या सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. लवकरच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Tags

follow us