Download App

Box Office: ’सॅम बहादूर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला; आठव्या दिवशी फक्त ‘एवढीच’ कमाई

Sam Bahadur Day 8 Box Office Collection: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) स्टारर ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटासोबत विकी कौशलचा (Vicky Kaushal) ‘सॅम बहादूर’ (Sam Bahadur Movie) हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. एकीकडे अ‍ॅनिमलने 8 दिवसांत 360 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे, तर दुसरीकडे सॅम बहादूरला आतापर्यंत 50 कोटी रुपयेही कमावता आलेले नाहीत. (Box Office) पहिल्या आठवड्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला आहे. चित्रपटाच्या आठवड्याच्या व्यवसायात मोठी घसरण झाली.


Sacknilk च्या रिपोर्टनुसार, ‘सॅम बहादूर’ने आठव्या दिवशी भारतात जवळपास 3.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यानंतर त्याचे एकूण कलेक्शन 42.05 कोटी रुपये झाले आहे. शुक्रवारी ‘सॅम बहादूर’ ची एकूण हिंदी 28.17 टक्के होती. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 6.25 कोटींचा व्यवसाय केला. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 9 कोटींची कमाई केली आणि तिसऱ्या दिवशी 10.3 कोटींच्या कलेक्शनसह चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली.

चौथ्या दिवशी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मोठी घसरण झाली आहे. या दिवशी सॅम बहादूरने 3.5 कोटींचा व्यवसाय केला. यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. तेव्हापासून आतापर्यंत चित्रपटाची कमाई केवळ 3 कोटींच्या आसपास आहे.

पाचव्या दिवशीही या चित्रपटाने साडेतीन कोटींचा व्यवसाय केला. सहाव्या दिवशी चित्रपटाने 3.3 कोटी, सातव्या दिवशी 3.03 कोटी आणि आठव्या दिवशी 3.28 कोटींचा व्यवसाय केला. हा चित्रपट 55 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे, परंतु तो खर्चही पूर्ण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे.

Box Office: ‘अ‍ॅनिमल’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम; चित्रपटाने आठव्या दिवशीही जमवला मोठा गल्ला

या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे. सॅम बहादूरमध्ये विकी कौशलने भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे. विकी व्यतिरिक्त या चित्रपटात सॅमच्या पत्नी सिल्लू माणेकशॉची भूमिका साकारणारी सान्या मल्होत्रा ​​आहे. यात फातिमा सना शेख देखील आहे आणि ती माजी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसत आहे.

Tags

follow us