Sam Bahadur : ‘सॅम बहादूर’ (Sam Bahadur) या विकी कौशल (Vicky Kaushal), फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांचा आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यात आणखी एक रंजक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे चित्रपटातील युद्ध प्रसंगांचे हुबेहूब चित्रण करण्यासाठी करण्यात आला रणगाडे आणि क्षेपणास्त्र डागणाऱ्या वाहनांचा खास समावेश करण्यात आला आहे.
शिक्षकाने पत्नीचा गळा चिरला, मुलाचा उशी ठेऊन जीव घेतला अन् स्वत:ही संपला
‘सॅम बहादूर’ (Sam Bahadur Movie) हा 2023 मधील बहुप्रतिक्षित सिनेमा आहे. मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट देशातील पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ आणि भारतीय लष्कराच्या असीम शौर्याला समर्पित आहे. या चित्रपटात विकी मुख्य भूमिका निभावणार आहे. या चित्रपटात युद्धासंदर्भात चार प्रमुख प्रसंग दाखविण्यात आले आहेत. ते अचूक पद्धतीने चित्रित करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला आहे.
मोठी बातमी : 17 दिवसांनंतर निसर्गाशी संघर्ष यशस्वी; बोगद्यातून मजुरांना बाहेर काढले !
निर्मात्यांनी प्रत्येक युद्धाचे प्रसंग त्या काळानुरूप वेगळे आणि अचूक बनवण्याकरता किती प्रयत्न केले. याची माहिती अलीकडेच आम्ही दिली. आता ही माहिती समोर येत आहे की, या चित्रपटातील महत्त्वाच्या युद्ध प्रसंगांच्या चित्रिकरणासाठी तोफा, क्षेपणास्त्र डागणारी वाहने, रणगाडे इत्यादींसह हजारो शस्त्रे आणि युद्ध वाहनांची खरेदी करण्यात आली होती.
Uttarakhand Tunnel: बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करणारे ‘हिरो’
हा चित्रपट असीम शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे, ज्यांनी भारतीय सैन्याचे तडफदार नेतृत्व केले आणि बांगलादेशची निर्मिती करण्यात मोलाची कामगिरी बजावली.
चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले असून त्यांनी भवानी अय्यर आणि शंतनू श्रीवास्तव यांच्या समवेत या चित्रपटाचे लेखन देखील केले आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी ‘आरएसव्हीपी मूव्हीज’च्या बॅनरखाली करण्यात आली आहे. या चित्रपटात विकी कौशल व्यतिरिक्त फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, नीरज काबी, एडवर्ड सोनेनब्लिक आणि झीशान अय्युब यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘सॅम बहादूर’ हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी चित्रपटगृहांत झळकणार आहे.