Sangeet Devbabhali Last Show: अनेक वेगवगेळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या कौतुकास पात्र ठरलेलं नाटक म्हणजे ‘संगीत देवबाभळी.’ (Sangeet Devbabhali) 22 डिसेंबर 2017 यादिवशी ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाचा सुरुवात झाली होती. 6 वर्षांपासून सुरू झालेला हा अनोखा प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. (Last Show) विठुरायाच्या आशीर्वादाने आणि आपल्या प्रेम प्रतिसादाने भारावलेली ही ‘संगीत देवबाभळी’ची नाट्य दिंडी लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या नाटकाचा आता शेवटचा प्रयोग होणार आहे.
‘संगीत देवबाभळी’ या नाटकाला आतापर्यंत 44 पुरस्कार देण्यात आले आहेत. या नाटकाने लाखो प्रेक्षकांसह अनेक दिग्गजांच्या मनाला मोठी भुरळ घातली आहे. मजल दरमजल करत संपूर्ण महाराष्ट्र विठुमय करणारी ही ‘देवबाभळी’ आता 500 व्या प्रयोगापर्यंत येऊन थांबला आहे. बुधवार, 22 नोव्हेंबर, संध्याकाळी 6:30 वाजता श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह, सायन, मुंबई या ठिकाणी अखेरचा प्रयोग पार पडणार आहे. कोरोना काळात देखील या नाटकाचे अनेक वेगवेगळे प्रयोग झाले आणि चाहत्यांनी या नाटकाला मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.
हा 6 वर्षांचा अनोखा प्रवास इतका आणि सोपा नव्हता. एक नवा विषय, नवीन लेखक, नवे कलाकार घेऊन या रंगभूमीवर येणे खूपच अवघड होते. परंतु भद्रकालीने हा प्रयोग केला आणि आपल्या साथीने तो यशस्वी झाला. मध्ये करोना सारखं भयाण संकट येऊन गेलं पण त्यानंतरही आपलं प्रेम कमी झालं नाही, ते चंद्रभागेसारखं वाहतच राहिलं.
प्रिया बापट नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 90च्या दशकातील थ्रिलरमध्ये दिसणार मुख्य भूमिकेत
अनेकांनी हा प्रयोग आणखीनही बघितलेला नाही तर काहींनी या प्रयोगाची पारायणं केली आहेत. अशा सर्व मायबाप प्रेक्षकांनासाठी ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक बघण्याची ही अखेरची संधी असणार आहे. खरं तर मायबाप प्रेक्षकांना आग्रह आहे की, नाटक बंद करू नका. परंतु कुठेतरी थांबणं हे अतिशय महत्वाचं असतं, म्हणून ही वारी 500 व्या प्रयोगापर्यंत नेवून आपण थांबणार आहोत अशी भावना नाटकाच्या दिग्दर्शकांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातला हा शेवटचा प्रयोग 22 नोव्हेंबर 2023 रोजी सायन येथील श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह या ठिकाणी मोठ्या दिमाखात पार पडणार आहे.