Sanjay Leela Bhansali : पावसाळा प्रत्येक भावनेला अधिक सिनेमॅटिक बनवतो. रिमझिम पाऊस, धुक्याने वेढलेला लाँग ड्राइव्ह किंवा खिडकीजवळ चहाचा कप हातात घेऊन घालवलेली निवांत संध्याकाळ अशा प्रत्येक क्षणाला योग्य संगीताची साथ मिळाली की तो अनुभव आणखी खास बनतो आणि जेव्हा अविस्मरणीय संगीताचा विषय येतो, तेव्हा संजय लीला भन्साळी यांच्याइतका प्रभावी दिग्दर्शक क्वचितच सापडेल. त्यांच्या भव्य सिनेमाई विश्वासोबतच भावनांनी ओथंबलेल्या संगीताने प्रेम, विरह, उत्कटता आणि समर्पण यांचे सुंदर चित्रण केले आहे. या पावसाळ्यात त्यांच्या या अजरामर गाण्यांना तुमच्या प्लेलिस्टमध्ये नक्की स्थान द्या.
सिलसिला ये चाहत का — देवदास
देवदास मधील हे अजरामर गीत पारोच्या निखळ प्रेमाची आणि समर्पणाची सुंदर कहाणी सांगते. भन्साळी यांची भव्य दृश्यरचना, काव्यमय गीत, मोहक नृत्यदिग्दर्शन आणि मधुर संगीत यामुळे हे गाणे पावसाळ्यातील रोमँटिक संध्याकाळीसाठी उत्तम निवड ठरते.
बाहों के दरमियां — खामोशी: द म्युझिकल
खामोशी: द म्युझिकल मधील हे सदाबहार प्रेमगीत खऱ्या प्रेमाची सुंदर अनुभूती देणारे आहे. याची शांत, मनाला स्पर्श करणारी चाल आणि हृदयस्पर्शी शब्द प्रेम आणि आपलेपणाची भावना जागवतात. निवांत पावसाळी संध्याकाळ, लाँग ड्राइव्ह किंवा जुन्या आठवणींमध्ये रमण्यासाठी हे गाणे सर्वोत्तम आहे.
झोंका हवा का —हम दिल दे चुके सनम
हम दिल दे चुके सनम मधील हे हलकेफुलके रोमँटिक गीत पावसाळ्याच्या ताजेपणाची जाणीव करून देते. प्रेमात पडण्याचा आनंद, थंडगार वारा, रिमझिम पाऊस आणि बेफिकीर क्षण यांचे सुंदर चित्रण या गाण्यात अनुभवायला मिळते.
लाल इश्क — गोलियों की रासलीला राम-लीला
उत्कट प्रेमाचा अनुभव घ्यायचा असेल, तर *लाल इश्क*सारखे गाणे दुसरे नाही. गोलियों की रासलीला राम-लीला मधील हे भावपूर्ण गीत आपल्या आत्म्याला स्पर्श करणाऱ्या गायकीतून आणि काव्यमय शब्दांतून प्रेमाची खोली आणि तीव्रता प्रभावीपणे व्यक्त करते. पावसाच्या सरींमध्ये या गाण्याची जादू अधिकच खुलते.
आयत — बाजीराव मस्तानी
बाजीराव मस्तानी मधील आयत हे संजय लीला भन्साळी यांच्या सर्वात सुंदर रोमँटिक रचनांपैकी एक आहे. निःस्वार्थ प्रेम, शांत भावना, मनाला स्पर्श करणारे बोल आणि सुरेल संगीत यामुळे हे गाणे पावसाळ्यातील शांत सकाळ किंवा निवांत संध्याकाळ अधिक खास बनवते.
बैरी पिया — देवदास
जुन्या काळातील प्रेमाची मोहकता बैरी पिया इतकी प्रभावीपणे क्वचितच एखाद्या गाण्यात अनुभवायला मिळते. देवदास आणि पारो यांची अविस्मरणीय केमिस्ट्री, शास्त्रीय संगीताचा गोडवा आणि भावनिक खोली यामुळे हे गाणे आजही तितकेच ताजे वाटते. पावसाळ्यात त्याची रोमँटिक अनुभूती अधिकच खुलून येते.
जब से तेरे नैना — सांवरिया
पहिल्या प्रेमाची निरागसता आणि मनातील ओढ यांचे सुंदर चित्रण करणारे सांवरिया मधील हे गीत प्रत्येक वेळी ऐकताना नवा अनुभव देऊन जाते. त्याची शांत, सुरेल चाल आणि स्वप्नवत सिनेमाई वातावरण पाऊस, धुके आणि निसर्गाच्या सौंदर्याशी अगदी सहज मिसळून जाते. त्यामुळेच प्रत्येक पावसाळी प्लेलिस्टमध्ये या गाण्याचा समावेश असायलाच हवा.
मुंबईतील मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी सहायक आयुक्तांसह चौघांचे चौकशीसापेक्ष निलंबन
देवदास आणि खामोशी: द म्युझिकल मधील अजरामर प्रेमकथा, हम दिल दे चुके सनम चा ताजेपणा, बाजीराव मस्तानीची भव्यता, गोलियों की रासलीला राम-लीला मधील उत्कट प्रेम आणि सांवरियाचे स्वप्नवत विश्व संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांतील संगीताने अनेक पिढ्यांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले आहे. या पावसाळ्यात ही अविस्मरणीय गाणी तुमच्या प्लेलिस्टमध्ये सामील करा आणि पावसातील प्रत्येक क्षण संजय लीला भन्साळी यांच्या एखाद्या कालातीत चित्रपटातील सुंदर दृश्याप्रमाणे अनुभव पहा.
