Sanjeeda Shaikh learned a big lesson : धमाल 4 प्रदर्शित होण्यासाठी आता अवघे काहीच दिवस उरले असून या लोकप्रिय चित्रपटमालिकेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अंजली आनंद आणि संजीदा शेख यांची या फ्रँचायझीमध्ये झालेली एंट्री असो किंवा खजिन्याच्या शोधासाठी निघालेल्या टोळीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि भन्नाट प्रवास असो, धमाल 4 मध्ये विनोद आणि मनोरंजनाची पातळी याआधीपेक्षा अधिक उंचावलेली दिसणार आहे.
या चित्रपटाद्वारे धमालच्या भन्नाट विश्वात प्रवेश करण्याचा अनुभव आणि विनोदी चित्रपटातून मिळालेला सर्वात मोठा धडा याबद्दल बोलताना संजीदा शेख म्हणाली, “माझी पहिली प्रतिक्रिया म्हणजे प्रचंड उत्साह होती. धमालसारखा चित्रपट माझ्या वाट्याला आला याचा मला खूप आनंद आहे, कारण ही केवळ एक फिल्म नाही तर पाच वर्षांच्या मुलांपासून ते पंच्याण्णव वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत सर्वांची आवडती ठरलेली एक लोकप्रिय परंपरा आणि फ्रँचायझी आहे. तसेच इंद्र कुमार सरांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला इश्क हा माझ्या सर्वात आवडत्या विनोदी आणि व्यावसायिक चित्रपटांपैकी एक आहे. त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय आणि स्वप्नवत होता.”
मला शिव्या द्या, महाराष्ट्राला बदनाम करू नका, मिसिंग लिंकवरून विधानसभेत फडणवीसांचा जोरदार पलटवार
ती पुढे म्हणाली,
“लोकांना हसवणे ही एक मोठी जबाबदारी असते आणि जर तुम्ही त्यात यशस्वी झालात तर कलाकार म्हणून ती अत्यंत खास भावना असते. या चित्रपटातून मला मिळालेला सर्वात मोठा धडा म्हणजे, जर तुम्ही स्वतःवर हसू शकत असाल तर तुम्ही इतरांनाही हसवू शकता. आमच्या संपूर्ण कलाकारांनी ही भावना मनापासून जपली. खरे तर उत्तम विनोद आणि कलाकारांमधील अप्रतिम केमिस्ट्री याच गोष्टींमधून निर्माण होते आणि धमाल 4 मध्ये प्रेक्षकांना ते अनुभवायला मिळणार आहे.” सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी खळखळून हसवणारे मनोरंजन घेऊन येणाऱ्या धमाल 4 मध्ये अजय देवगण, अरशद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी आणि संजय मिश्रा यांच्यासोबत ईशा गुप्ता, संजीदा शेख, अंजली आनंद, उपेंद्र लिमये, विजय पाटकर आणि रवी किशन यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
धमाल 4 हा चित्रपट गुलशन कुमार आणि टी-सीरिज प्रस्तुत असून देवगण फिल्म्सच्या सहयोगाने टी-सीरिज फिल्म्स, मरुती इंटरनॅशनल आणि पॅनोरमा स्टुडिओज यांची निर्मिती आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले असून अजय देवगण, भूषण कुमार, कृष्ण कुमार, अशोक ठकेरिया, इंद्र कुमार, आनंद पंडित आणि कुमार मंगत पाठक हे चित्रपटाचे निर्माते आहेत. हास्य, गोंधळ, साहस आणि मनोरंजनाचा तडका घेऊन येणारा धमाल 4 हा चित्रपट 10 जुलै 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
