Download App

Prashant Damle: ‘इसको बोलता हैं जिगर?’, चालकाची प्रकृती बिघडताच संकर्षण कऱ्हाडेनं चालवली बस

Prashant Damle Video Share: अभिनेता- लेखक संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर सतत चर्चेत असतो. संकर्षणच्या सिरीयल, सिनेमे, नाटक चाहत्यांच्या आवडीचा विषय आहे. याच संकर्षण कऱ्हाडेने ( Sankarshan Karhade) एक खास गोष्ट केली आहे, (Video Viral ) ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. संकर्षण कऱ्हाडेने थेट नाटकाची बस चालवली आहे. संकर्षणचा हा व्हिडिओ थेट प्रशांत दामले यांनी फेसबुकला शेयर केले आहे.

प्रशांत दामले सांगितले आहे की, काल रात्री कोथरूडच्या प्रयोगाला आमचा चालक प्रवीणला बर वाटेनास झाले होते. साधारणपणे प्रयोग 12.30 ला संपल्यावर आम्ही सेट भरून जेवून पहाटे 2 च्या सुमारास मुंबईकडे निघतो. पण चालक आजारी पडला म्हटल्यावर सगळच थांबल. पण थांबेल तो संक्या कसला. त्याने चालकाला मागे झोपवल आणि स्वतः ड्राइवर सीटवर बसला आणि लोणावळ्यापर्यंत बस हाणली, अशी पोस्ट त्यांनी यावेळी लिहिली आहे.


नेमकं काय आहे पोस्टमध्ये?

काल रात्री कोथरूडच्या प्रयोगाला आमचा चालक प्रवीण ह्याला बर वाटेनास झाल. साधारणपणे प्रयोग 12.30 ला संपल्यावर आम्ही सेट भरून जेवून पहाटे 2 च्या सुमारास मुंबईकडे निघतो. पण चालक आजारी पडला म्हटल्यावर सगळच थांबल. पण थांबेल तो संक्या कसला. त्याने चालकाला मागे झोपवल आणि स्वतः ड्राइवर सीटवर बसला आणि लोणावळ्यापर्यंत बस हाणली. त्याच्याकडे हेवीचा पण लायसन आहे हे कालच मला कळले. लोणावळ्याला ड्राइवर ओके आणि मग संक्या मागे जाऊन झोपला. इसको बोलता हैं जिगर नाटकाचे प्रयोग आणि बस एकाच स्पीड ने चालु आहेत प्रशांत दामले यांनी हा व्हिडिओ शेअर करत संकर्षणचं कौतुक केले आहे.

खरेतर अभिनेता, लेखक, कवी असलेला संकर्षण प्रत्येक बाबतीत ऑल राउंडर आहे हेच यातून दिसत आहे. या व्हिडिओवर सगळीकडून खूपच कौतुकाचा वर्षाव होत आहे. अभिनेते प्रशांत दामले हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी नाट्यसृष्टीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी अनेक लोकप्रिय नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. नुकताच त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमधला १२ हजार ५०० वा नाट्यप्रयोग सादर केला.

Sirf Ek Banda Kafi Hai: मनोज बाजपेयींचा ‘‘सिर्फ एक बंदा..’ सिनेमा लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर

प्रशांत दामले यांनी त्यांच्या विनोदीबुद्धीने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. नाटकांच्या बरोबरीने त्यांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर ते पाककृतीशी निगडित असलेल्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन देखील केले होते.

Tags

follow us