Download App

Sanya Malhotra: अभिनेत्री सान्या मल्होत्राने दिला खास फिटनेस मंत्र, मस्तीचा मस्त फॉर्म्युला

Sanya Malhotra: बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'जवान'नंतर तिच्या आगामी 'मिसेस' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Sanya Malhotra: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) ​​तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘जवान’नंतर (Jawaan) तिच्या आगामी ‘मिसेस’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सान्या या चित्रपटासाठी चर्चेत आहे. ‘द ग्रेट इंडियन किचन’ (The Great Indian Kitchen) या मल्याळम सिनेमाची ही हिंदी आवृत्ती आहे.


मात्र आता अभिनेत्री चाहत्यांना काही कमालीच्या फिटनेस टिप्स देताना कायम दिसते आणि यातून ती सगळ्यांना फिट राहण्यासाठी प्रेरणा देखील देते. अभिनेत्री सान्या मल्होत्रा ट्रेनर त्रिदेव पांडे यांनी कॅप्चर केलेला एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला असून कायम फिटनेस राहण्याकडे तिचा कसा कल आहे ते यातून पाहायला मिळत आहे. सान्या आज बॉलीवूडमधील सर्वात फिट असलेल्या अभिनेत्री पैकी एक आहे आणि तिचे फिटनेस व्हिडिओ नेहमीच चर्चेत असतात.

Sonakshi Sinha: हीरामंडी पाहिल्यानंतर अभिनेत्रीने मागितली मनीषा कोईरालाची माफी? म्हणाली…

अभिनेत्रीची फिटनेसची आवड तिच्या ऑन-स्क्रीन परफॉर्मन्समध्येही दिसून येते. तिने नेहमी सक्रिय आणि निरोगी राहण्यााठी प्रयत्न करत असते. कामाच्या आघाडीवर सान्या साइनिंग स्पीरीवर आहे. आरती कडव दिग्दर्शित ‘मिसेस’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त चित्रपटात ती दिसणार आहे, जो या वर्षी प्रदर्शित होणार आहे. तिने अलीकडेच धर्मा प्रॉडक्शनच्या ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले, ज्याचे दिग्दर्शन शशांक खेतान करणार आहेत या प्रोजेक्टमध्ये वरुण धवन आहे.

follow us