Sapane vs. Everyone 2 : द वायरल फिव्हर (टीव्हीएफ) आज मनोरंजन विश्वातील आघाडीच्या आशय निर्मात्यांपैकी एक बनला आहे. आपल्या अत्यंत वास्तववादी आणि दर्जेदार मालिकांमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. टीव्हीएफचा आशय नेहमीच लोकांच्या मनाला भिडणारा राहिला असला, तरी प्रेक्षकांची त्यांच्याकडून सतत काहीतरी नवीन पाहण्याची अपेक्षा असते. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे ‘‘सपने वर्सेस एवरीवन 2’ या मालिकेला मिळालेलं अफाट यश. या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांसाठी यूट्यूबवर उपलब्ध झाला होता आणि त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. या प्रचंड यशानंतर अलीकडेच प्राइम व्हिडिओवर त्याचा दुसरा भाग प्रदर्शित करण्यात आला असून, तो आता ओटीटी विश्वात मोठा गाजत आहे.
अरुणाभ कुमार यांच्यासोबतच्या नात्याबद्दल आणि टीव्हीएफच्या ‘एनसीआर डेज’ तसेच ‘‘सपने वर्सेस एवरीवन 2’ या लोकप्रिय मालिकांवर काम करण्याच्या अनुभवाबद्दल अभिनेता आणि निर्माते अंबरीश वर्मा म्हणाले, “माझ्या मते अरुणाभ एखाद्या व्यक्तीची प्रामाणिक मेहनत लगेच ओळखतात. कारण त्यांनी स्वतः शून्यातून सुरुवात करून टीव्हीएफसारखं मोठं विश्व उभं केलं आहे. त्यामुळे जेव्हा त्यांना एखाद्या निर्मात्यामध्ये तसाच जिद्दीचा आणि मेहनतीचा स्वभाव दिसतो, तेव्हा त्यांच्या मनात त्या व्यक्तीसाठी एक वेगळं स्थान तयार होतं. मी जेव्हा जेव्हा कोणतीही कल्पना घेऊन त्यांच्याकडे गेलो मग ती ‘एनसीआर डेज’ असो किंवा ‘‘सपने वर्सेस एवरीवन 2’ त्यांनी नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवत मला पूर्ण पाठिंबा दिला.”
विधानपरिषदेची रणधुमाळी! राष्ट्रवादीच्या जागेवर भाजपाचा डोळा? इच्छुकांच्या भाऊगर्दीने वाढवली डोकेदुखी
दुसऱ्या भागाला मिळालेल्या दमदार प्रतिसादानंतर या मालिकेचा पुढचा प्रवास आणखी मोठा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंबरीश यांची वास्तववादी शैली आणि मालिकेची मनाला भिडणारी कथा प्रेक्षकांच्या इतकी जवळ पोहोचली आहे की, आता या कथानकावर चित्रपट तयार होण्याच्या चर्चेमुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘‘सपने वर्सेस एवरीवन 2’ या मालिकेचा आयएमडीबीच्या जागतिक सर्वोत्तम 250 मालिकांच्या यादीत समावेश झाल्यानंतर टीव्हीएफने जागतिक पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यादीत टीव्हीएफच्या ‘टीव्हीएफ पिचर्स’, ‘पंचायत’, ‘गुल्लक’, ‘कोटा फॅक्टरी’, ‘एस्पिरंट्स’ आणि ‘ये मेरी फॅमिली’ यांसारख्या मालिकांचाही समावेश आहे.
टीव्हीएफने ‘द डेव्हिल वेअर्स प्राडा 2’, ‘एक दिन’, ‘शिवाजी’, ‘पॅट्रियट’ आणि ‘ग्लोरी’ यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या प्रदर्शित कलाकृतींनाही मागे टाकत उत्कृष्ट आशय निर्मितीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आज टीव्हीएफ भारतासह दक्षिण भारतीय आणि हॉलिवूड पातळीवरही विश्वासार्ह निर्मिती संस्थांपैकी एक मानला जात आहे.
याशिवाय ‘प्राइम व्हिडिओ प्रेझेंट्स’ कार्यक्रमात टीव्हीएफने आपल्या आगामी प्रकल्पांच्या दमदार घोषणांनी संपूर्ण वातावरण रंगवलं. ‘व्वान’ आणि ‘कॉलेज फेस्ट’सारखे चित्रपट, ‘पिरॅमिड’ आणि ‘वंश’सारख्या नव्या मालिका, तसेच ‘एस्पिरंट्स’, ‘पंचायत’, ‘ग्राम चिकित्सालय’, ‘सपने विरुद्ध प्रत्येकजण’ आणि ‘संदीप भैया’ यांच्या नव्या पर्वांची घोषणा करत त्यांनी त्या संध्याकाळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
