Download App

Dipika Kakar Quits Acting: ‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेत्री दीपिका कक्करचा अभिनयाला रामराम

Dipika Kakar Quits Acting: ससुराल सिमर का या टीव्ही शोद्वारे (TV show) आपल्या अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या दीपिका कक्करने (Dipika Kakar) आता अभिनय क्षेत्राला कायमचा रामराम केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्रीने टीव्ही शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि तिचे सर्व लक्ष तिच्या कुटुंबावर केंद्रित करणार असल्याचे तिने यावेळी सांगितले आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला दीपिका आणि तिचा पती, अभिनेता शोएब इब्राहिम (Actor Shoaib Ibrahim) यांनी घोषित केले की ते त्यांच्या पहिल्या मुलाची अपेक्षा करत आहेत. दीपिका कक्करने नुकतेच एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, ती खूप दिवसांपासून अभिनयात सक्रिय होती आणि आता तिला हे क्षेत्र सोडायचे आहे.


एअर होस्टेस ते अभिनेत्री!

अभिनेत्री दीपिका कक्कर हिचा जन्म 6 ऑगस्ट 1986 रोजी पुण्यात झाला आहे. दीपिकाने मुंबई विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर तिने एअर होस्टेस बनण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. हे शिक्षण पूर्ण केल्यावर तिने जेट एअरवेजमध्ये 3 वर्षे एअर होस्टेस म्हणून काम देखील केले आहे. मात्र नंतर तब्येतीच्या कुरबुरीमुळे तिने ही नोकरी सोडली आणि मनोरंजन विश्वामध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला होता.

सीरियलमधून केली करिअरची सुरुवात

दीपिकाने मनोरंजन विश्वात प्रवेश केला होता, त्यावेळी तिचे लग्न झाले होते. दीपिका कक्करचे पहिले लग्न रौनक सॅमसनशी झाले होते, जो पायलट होता. मात्र, प्रेमविवाह असून देखील हे नाते फार काळ टिकले नाही. दीपिकाने सुरुवातीला अनेक मालिकांमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत. तिने 2010 मध्‍ये ‘नीर भरे तेरे नैना देवी’ मधून आपल्या टीव्ही करिअरची सुरुवात केली. यानंतर ती ‘अगले जनम मोहे बिटिया ही कीजो’मध्येही झळकली होती. मात्र, 2011मध्ये सुरु झालेल्या ‘ससुराल सिमर का’ या मालिकेने तिचे नशीब पालटले. या सीरियलमध्ये तिने ‘सिमर’ ही मुख्य भूमिका साकारली होती. दीपिकाने ‘बिग बॉस’ या शोचे विजेतेपदही पटकावले आहे.

‘मुस्लिमांचा द्वेष ही एक फॅशन बनली, सरकारकडून….’; नसीरुद्दीन शाह यांचे मोठे विधान

दीपिकाला मिळाली शोएबची साथ

‘ससुराल सिमर का’ दरम्यान दीपिका आणि तिचा पहिला पती रौनक यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली होती. अनेकवेळा सीरियलच्या सेटवर देखील या दोघांचे वाद व्हायचे. या वादांना कंटाळून 2015 मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. अशा कठीण प्रसंगात दीपिकाला साथ दिली ती तिच्या ऑनस्क्रीन पतीने अर्थात अभिनेता शोएब इब्राहिम याने. शोएब या सीरियलमध्ये दीपिकाच्या पतीची भूमिका साकारत होता. या शोच्या दरम्यान दोघेही चांगले मित्र बनले होते. शोएबने दीपिकाला वाईट काळात साथ दिली. दरम्यान दोघांमध्ये प्रेम फुलू लागले.

बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका आणि शोएबने 2018मध्ये मुस्लिम रितीरिवाजांनुसार लग्न केले. लग्न करण्यासाठी दीपिकाने इस्लाम धर्म स्वीकारला होता. यावेळी तिने तिचे नाव बदलून फैजा केले. मात्र, आजही सगळे तिला दीपिका या नावानेच ओळखतात.

 

Tags

follow us