Download App

Satish Kaushik : तेव्हा सतिश कौशिक यांनी गर्भवती अभिनेत्रीला घातली होती लग्नाची मागणी

  • Written By: Last Updated:

Satish Kaushik And Neena Gupta :  अभिनेते सतिश कौशिक ( Satish Kaushik ) यांचे वयाच्या 66 व्या वर्षी निधन झाले आहे. ह्रदयविकाराचा झटका आल्याने कौशिक यांचा मृत्यू झाला आहे. सतिश कौशिक हे एक उत्कृष्ट अभिनेते व दिग्दर्शक होते. याचबरोबर माणुस म्हणून देखील ते एक अतिशय संवेदनशील होते. याबाबत अभिनेत्री नीना गुप्ता ( Neena Gupta ) यांनी आपल्या आत्मचरित्रात एक आठवण सांगितली आहे.

सतिश कौशिक यांनी त्यांचे शशि यांच्यासोबत लग्न होण्याच्या आधी नीना गुप्ता यांना लग्नासाठी मागणी घातली होती. त्यावेळी नीना या लग्नाच्या आधीच गरोदर राहिल्या होत्या. कौशिक यांची ही मागणी नीना यांनी अमान्य केली होती. ही आठवण नीना यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितली आहे.

प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन

नीना गुप्ता व सतिश कौशिक हे दोघे आधीपासूनच चांगले मित्र होते. त्यावेळी नीना या वाईट काळातून चालल्या होत्या. याचे कारण त्या लग्नाच्या आधीच गरोदर राहिल्या होत्या. समाज त्यांना काय म्हणेल या विचाराने त्या चिंतीत होत्या. त्यावेळी त्या एकट्या पडल्या होत्या. तेव्हा कौशिक यांनी मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, असे सांगितले होते. तु काळजी करु नको, मी आहे. जर बाळ काळ्या रंगाचे जन्माला आले तर मी तुझ्याशी लग्न करेल, असे कौशिक नीना यांना म्हणाले होते.

यानंतर नीना यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. या प्रसंगानंतर त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली. नीना गुप्ता या 80च्या दशकामध्ये स्टार क्रिकेटर विवियन रिचर्डस यांच्या प्रेमात पडल्या होत्या. यानंतर त्या गरोदर राहिल्या. पण रिचर्डस हे विवाहित असल्या कारणाने ते नीना यांच्याशी लग्न करु शकत नव्हते. यानंतर नीना यांनी एकटीने बाळाला जन्म दिला. नीना यांनी 2008 साली विवेक मेहरा यांच्यासोबत लग्न केले आहे.

दरम्यान सतिश कौशिक यांना त्यांचे जवळचे मित्र अभिनेते अनुपम खेर यांनी देखील श्रद्धांजली वाहिली आहे. मला माहित आहे मृत्यू हे या जगाचे शेवटचे सत्य आहे! पण मी माझ्या जिवलग मित्र सतीश कौशिक बद्दल असे लिहीन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. 45 वर्षांच्या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम!! सतीश तुझ्याशिवाय आयुष्य कधीच सारखे होणार नाही! ओम शांती!, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

Tags

follow us