Download App

Box Collection: वीकेंडला ‘सत्यप्रेम की कथा’ची छप्परफाड कमाई! बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहिलंत?

Box Collection: अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) यांचा ‘सत्यप्रेम की कथा’ (Satyaprem Ki Katha) हा सिनेमा चाहत्यांची चांगलंच मनं जिंकत असल्याचे दिसून येत आहे. हा सिनेमा २९ जून रोजी सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. सोशस मीडियावर अनेक चाहते पोस्ट शेअर करुन ‘सत्यप्रेम की कथा’ या सिनेमाचे मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या सिनेमाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे.


या सिनेमाने महिनाअखरेस किती कमाई केली? याबाबत जाणून घेणार आहेत. ‘सत्यप्रेम की कथा’ या सिनेमाने पहिल्या दिवशी ९.५ कोटींची मोठी कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईमध्ये मोठी  घसरणझाल्याचे देखील दिसून आले आहे. दुसऱ्या दिवशी या सिनेमानं ७ कोटींचा मोठा गल्ला कमावला आहे. परंतु वीकेंडला या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलंच धुमाकूळ घालायचे दिसून आले आहे. तसेच शनिवारी या सिनेमाने १०.१० कोटींचे कलेक्शन केले होते. आता रविवारी (2 जुलै) या सिनेमाने १२ कोटी रुपयांचा गल्ला जमावाला आहे.

या सिनेमाची एकूण गल्ला ३८.३५ कोटी जमवला आहे. अभिनेत्री कियारा आडवाणीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये असे दिसून आले आहे की, ‘सत्यप्रेम की कथा’ हा सिनेमा बघून झाल्यावर स्टँडिंग ओव्हेशन देण्यात आले आहे. कियारानं या व्हिडीओ एक कॅप्शन देखील दिले आहे, ‘जेव्हा प्रेक्षक स्टँडिंग ओव्हेशन देत असतात, तेव्हा तुम्हाला समजते की सिनेमाची जादू निर्माण झाली आहे, कायम लक्षात राहिल असा हा क्षण असतो. तसेच समीर विद्वांस या मराठमोळ्या दिग्दर्शकाने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

Ranjit Sidhu: सुप्रसिद्ध गायकाने संपवलं स्वतःचं आयुष्य; रेल्वे ट्रॅकजवळ सापडला मृतदेह

‘सत्यप्रेम की कथा’ या सिनेमामध्ये कार्तिक आणि कियारा यांच्याबरोबर सुप्रिया पाठक कपूर, गजराज राव, सिद्धार्थ रंधेरिया, अनुराधा पटेल, राजपाल यादव, निर्मित सावंत आणि शिखा तल्सानिया या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका बजावली असल्याचे दिसून आले आहे. कियारा आडवाणी आणि कार्तिक आर्यन यांचा भूल भूलैय्या-2 हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरल्याचे बघायला मिळाले होते. आता ‘सत्यप्रेम की कथा’ या सिनेमामधून ही जोडी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘सत्यप्रेम की कथा’ या सिनेमाची कथा कार्तिक आर्यननं साकारलेल्या सत्यप्रेम आणि कियाराच्या कथा या भूमिकेच्या सभोवती फिरत असल्याचे दिसून आले आहे. या सिनेमाच्या कथानकाचे अनेक चाहते मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत.

Tags

follow us