Download App

Sayali Sanjeev: “त्याचं जेव्हा लग्न होईल तेव्हा…”, ऋतुराजसोबतच्या चर्चांवर सायली संजीव स्पष्टच बोलली

Sayali Sanjeev On Ruturaj Gaikwad : अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev ) सध्या अनेक सिनेमांचं शूटिंग करण्यात व्यस्थ आहे. या नवीन वर्षात दर महिन्याला नवा सिनेमा आणि भूमिकेसाठी अभिनेत्री सायली संजीव काम करत असल्याचे दिसून येत आहे. (Sayali Sanjeev On Ruturaj Gaikwad) ‘काहे दिया परदेस’ या सिरीयलने सायली संजीव हा नवा चेहरा मनोरंजनसृष्टीला दिला. यानंतर ‘आटपाडी नाइट्स, बस्ता, झिम्मा, गोष्ट एका पैठणी, अशा सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारत अभिनेत्री सायली संजीवने चांगली अभिनेत्री असल्याचे दाखवून दिले आहे.


सायलीच्या सिनेमाची जितकी चर्चा होते, तितकी तिच्या खागसी आयुष्याची होत असल्याचे दिसून येत आहे. सायली आणि क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांच्या नात्याची चर्चा थांबायचं नाव घेत नाहीये. सायलीने या पूर्वी अनेकवेळा दोघांच्या नात्याबद्दल सांगितले आहे. दोघांमध्ये फक्त मैत्रीचे नात होते. पण सोशल मीडियावरील चर्चेमुळे आता ते देखील तितक राहिल नसल्याचं तिने एका मुलाखतींमध्ये स्पष्ट केले आहे.

ऋतुराज गायकवाडच्या प्रत्येक मॅचच्या दरम्यान, सायलीच्या फोटोंखाली कमेंट्सचा पूर आल्याचे बघायला मिळत. चाहते तर थेट वहिनी म्हणून तिचा उल्लेख करत असतात. यामुळे या चर्चेची, ट्रोलिंगची आता भीती वाटू लागली, असे सायलीने एका दिलेल्या मुलाखीत सांगितले आहे. ऋतुराजच्या एका मॅचनंतर दुसऱ्या दिवशी सायलीने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधला एक फोटो शेअर केला होता. त्यामुळे चाहत्यांनी त्यांना जोडायचं ते कनेक्शन जोडायला सुरुवात केली. यावरही सायलीने स्पष्टच भाष्य केलं आहे.


नेमकं काय म्हणाली सायली?

गेल्या काही दिवसांपूर्वी मी पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधला एक फोटो सिनेमाच्या प्रमोशनसाठी शेअर केला होता. या पोस्टवरच्या कमेंट्स वाचून मला भीती वाटायला लागली. आता पिवळे कपडे घालणे देखील बंद करावं लागणार की, काय असं मला वाटू लागलं. त्याचं दुसऱ्या कोणाबरोबर लग्न होईल आणि माझं दुसऱ्या एकासोबत…तेव्हाच चर्चा बंद होणार असल्याचे तिने यावेळी सांगितले.

Sanjay Dutt Injured : दुखापतीनंतर संजय दत्तच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट समोर

दरम्यान, याअगोदर देखील दिलेल्या मुलाखतीमध्ये सायलीने या सवालापासून पळ काढू शकत नाही, असे सांगितले होते. अशा वेळी ‘नो कमेंट्स’ म्हणून आपण ती गोष्ट सोडून देऊ शकतो. मात्र, मला या गोष्टींना सामोरं जाणं महत्त्वाचं वाटतं. मी पळ काढत नाही. काहीच नसताना माझं नाव त्याच्याशी जोडलं जातं आहे.

याचा वैयक्तीक आयुष्यात नक्कीच त्रास होणार आहे. तुमची चूक नसताना या गोष्टींना मला तोंड द्यावं लागतं. अफवांना किती प्राधान्य द्यायचं, हे स्वतःशी ठरवलं, की गोष्टी सोप्या होत असतात. आपण उगाच ट्रोल करतोय, हे चाहत्यांना कळावं, एवढीच इच्छा! असे तिने स्पष्टच सांगितले.

Tags

follow us