Download App

Eid Mubarak: अभिनेता शाहरुख खान मुलगा अबरामसोबत मन्नत बाहेर, चाहत्यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा!

  • Written By: Last Updated:

Shah Rukh Khan On Eid 2023: आज देशभरात ईदचा सण (Eid 2023) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बॉलीवूडमधील सर्व सिनेतारकांनी चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अशा परिस्थितीत इंडस्ट्रीमधील मेगा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) या बाबतीत मागे कसा राहणार? ईद (EID 2023) च्या खास प्रसंगी शाहरुख खानने मन्नतच्या घराबाहेर उपस्थित राहून हजारो चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच ईदच्या शुभेच्छा देत असताना शाहरुख खानचा एक नवीन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.


‘पठाण’ चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर शाहरुख खान नक्कीच ईदच्या शुभेच्छा द्यायला येईल, या आशेवर शनिवारी ईदच्या मुहूर्तावर चाहते त्याच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात जमले होते. अशा परिस्थितीत आता शाहरुख खानचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये शाहरुख मन्नतच्या घराबाहेर उपस्थित असलेल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ प्रसिद्ध छायाचित्रकार मानव मंगलानी यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ईदच्या निमित्ताने शाहरुखच्या घराबाहेर हजारो चाहते उपस्थित आहेत. ईदच्या दिवशी त्यांच्या आवडत्या स्टारची एक झलक पाहण्यासाठी चाहते मन्नतच्या बाहेर कडक उन्हात जमले आहेत. मात्र शाहरुख खाननेही आपल्या चाहत्यांना निराश केला नाही आणि मन्नतमधून बाहेर पडून आपल्या चाहत्यांसाठी ईदच्या शुभेच्या दिल्या आहेत.

शाहरुखचा पठाण ठरला ‘किंग’… तर ‘भाई’ की निकली ‘जान’

‘पठाण’ चित्रपटाच्या उत्तुंग यशानंतर आता सर्वजण शाहरुख खानच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. किंग खानचा जवान हा चित्रपट 2 जून 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत साऊथची सुपरस्टार नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Tags

follow us